<
भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश “आझादी का अमृत महोत्सव” मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरीब कल्याण संमेलन.. शत प्रतिशत सशक्तीकरण अंतर्गत वेब संवाद व खरीप पूर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन 31 मे रोजी
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : – भारतीय स्वातंत्रयाच्या स्मरणार्थ देश “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करत आहे. या महत्वाच्या प्रसंगाचा एक भाग म्हणून मा. पंतप्रधान भारत सरकारच्या नऊ मंत्रालये व विभागांच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.
जळगाव जिल्हा या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान असून दिनांक 31 मे, रोजी सकाळी 10.00 वाजता कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव आयोजित कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख उदघाटक म्हणून मा. खासदार लोकसभा मतदार संघ श्री. उन्मेशदादा भैय्यासाहेब पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव, मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगाव, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम मा. प्रधानमंत्री महोदय पहिल्या सत्रात विविध लाभार्थ्यांशी संवाद साधणार असून दुसऱ्या सत्रात जिल्हयातील शेतकरी बांधवांच्या हितार्थ खरीप पुर्व शेतकरी मेळावा व तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवानी जास्तीतजास्त संख्येन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.