<
जळगाव, दि. २ (प्रतिनिधी) – फालीच्या ८ व्या संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते १०.३० दरम्यान जैन हिल्स येथील परिश्रम हाॅल, बडी हांडा हाॅल व गांधीतीर्थ ऑडिटोरीयम येथे ६७ शाळांमधील सुमारे २५० विद्यार्थींनी ६७ बिझनेस प्लॅन सादर केले. विद्यार्थ्यांना अत्यंत कल्पक पद्धतीने मोठ्या आत्मविश्वासाने आपले बिझनेस प्लॅन सादर केले. यावर्षी विद्यार्थीनिंचा लक्षणीय सहभाग जाणवला.परिश्रम हाॅलमध्ये झाले २३ बिझनेस प्लॅनकेळी, लाल मिरची पावडर, नीम बी अॅबस्ट्रॅक्ट, कवठापासून कलाकंद, मश्रुम, जिरेनियम तेल उत्पादन, जिरेनियम शेती व प्रक्रिया, सोयाबीन पासून उत्पादने, कुत्र्यांसाठी केळीचे बिस्कीट, ऊसाचा जाम, नर्सरी, कोबीचे उत्पादन, टोमॅटो कॅचप, आयुर्वेदीक औषधी इत्यादी बिझनेस प्लॅनचा समावेश होता. सातपुडा विद्यालय लोणखेडा (नंदुरबार), वाल्मिकी माध्यमिक विद्यालय पुरुषोत्तम नगर (नंदुरबार), जीवन विकास विद्यालय बुलढाणा, न्यू इंग्लिश स्कूल जाखनगाव (सातारा), नूतन माध्यमिक विद्यालच चिगेगाव (नाशिक), म. ज्योतीबा फुले विद्यालय देऊळगाव (बुलढाणा), भारतमाता माध्यमिक विद्यालय मायनी (सातारा), हिरकणी विद्यालय गावडेवाडी, पुणे, कुलस्वामीनी खांदेराई विद्यालय हिवरे (पुणे), बी.डी. आदर्श विद्यालय केळवड (नागपूर) ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा (भंडारा), एम.पी.के. विद्यालय, जांभळी (बुलढाणा), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवाडे (सांगली), सारडा विद्यामंदीर वरुद (जालना), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाळा महादेव (अहमदनगर), के.के. धुळे माध्यमिक विद्यालय मांजरी बु. (पुणे), पी.जे. म्हात्रे विद्यालय नेवाडे (रायगड), जनता गर्ल्स हायस्कूल शेघाट (अमरावती), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज (सातारा), एम. एस. पांचाळ हासस्कूल सालारपुरा (सावरकाठा गुजरात), जी.डी. माळी हायस्कूल अझापुरा (बनासकांठा, गुजरात), एम.एम. शहा विनय विद्यालय मंदीर हायस्कूल गोला (बनासकाठा गुजरात), सरस्वती कन्या विद्यालय वडगांव (बनासकाठा गुजरात) या शाळांच्या विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन सादर केेले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्ष नौरियल होते तर परिक्षक म्हणून संदीप सिंग (गोदरेज अॅग्रोव्हेट), स्वानंद गुधाटे (महिंद्रा अॅण्ड महिंद्रा), गिरेश मोहन (आयटीसी), राकेश सानवाल (शैलेज इंडिया), अमोल कदम (युपीएल), डाॅ. अनिल ढाके (जैन इरिगेशन), मयंक सिंघल (स्टार अॅग्री), डाॅ. योगेश पटेल (अमूल) यांचा समावेश होता.*बडीहांडा हाॅलमध्ये सादर बिझनेस प्लॅन -*हळदीचे लोणचे, करवंद लोणचे. तांदुळापासून कुरकुरीत कुकीज, अॅग्री टुरिझम, वाईन बनवणे, मिरची पावडर, शेवगा शेती उत्पादने, च्यवनप्राश, आयुर्वेद तेल, पोलट्री, पांढरा कोळसा बनविणे, शेंगदाणा चिक्की व विक्री, ड्रॅगन फ्रूट फार्मिंग, सूर्यफूल शेती, संत्रापासून फेस, मधमाशी पालन इत्यादी बिझनेस प्लॅन सादर केले. याचे संचालन अमोल काकडे यांनी केले तर परिक्षक म्हणून जैन फार्म फ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, डाॅ. शविंदर कुमार (महेंद्र अॅण्ड महेंद्र), डाॅ. नानासाहेब दुरापे, अजय सेट (अमूल), हर्षल सोनवणे (यूपीएल), व्ही. विजय वर्धान (आयटीसी), सागर सत्या (ओमनीवीर) यांचा समावेश होता.सर्वोदय विद्यामंदीर, प्रकाशा (नंदुरबार), एस. एस. पाटील विद्यामंदीर चहार्डी (जळगाव), नूतन माध्यमिक विद्यालय किनगावराजा (बुलडाणा), कर्मवीर अॅण्ड विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय (नाशिक), वसंतदादा पाटील हायस्कूल मडसंगली (नाशिक), राजापूर हायस्कूल राजापूर (सातारा), समाजभूषण हिम्मतराव साळुंखे विद्यालय, कालेढोण (सातारा), श्री. पंढरीनाथ विद्यालय पोखरी (पुणे), नवचैतन्य हायस्कूल शिवणी (भंडारा), वसंतराव नाईक हायस्कूल, जरुड (अमरावती), महात्मा गांधी विद्यालय कन्या विद्यालय प्रवशनगर (अहमदनगर), महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा (अहमदनगर), श्रीराम विद्यालय नांदगोमुख (नागपूर), नवजीवन विद्यालय व काॅलेज, जमनापूर (भंडारा), स्व. शेवंताबाई विद्यालय गोदरी (जालना), न्यू इंग्लिश स्कूल पारगाव सलू-मलू (पुणे), टी.एच. वाजेकर विद्यालय फुंडे (रायगड), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरले (सांगली), एम.डी. सोमानी हायस्कूल (बनासकाठा, गुजरात), जे.बी. उपाध्याय हायस्कूल महिवाल साबरकाठा (गुजरात), के.एम. हायस्कूल सोनसान साबरकाठा (गुजरात), के. एच. हायस्कूल पिलूछा बनासकाठा (गुजरात) यांचा समावेश होता.गांधीतीर्थ ऑडिटोरियम येथील सादरीकरणहळद, लोणचे, तूप बनविणे, संवा प्रक्रिया, जिरेनियमची शेती, मश्रुम उत्पादन, संत्रापासून फेस वाॅश, सुक्य फुलांपासून रंग बनविणे, रंगीन मत्सोत्पादन, सुगंधी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्य बनवणे, पापड बनविणे, गो पालन इत्यादी बिझनेस प्लॅन व माॅडले यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणासाठी परिक्षक म्हणून आशिष डोभाल (यूपीएल), के.बी. पाटील (जैन इरिगेशन), डाॅ. प्रीती शुक्ला (अमूल), अजय तुरकाने (रॅलीज इंडिया), कल्पेश ओझा (स्टार अॅग्री), नेहा कयाल (गोदरेज अॅग्रोव्हेट), शैलेश इंदूलकर (सेंजेंटा) यांचा समावेश होता. पुष्पावती चौधरी विद्यालय बामखेडा (नंदुरबार), पं. जवाहरलाल विद्यालय अकुलखेडा (जळगाव), जिजामाता विद्यालय साखरखेडा (बुलडाणा), अरुढ हायस्कूल महाल साकोरे (नाशिक), अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय अशा सुमारे २२ शाळांचा सहभाग होता.*इनोव्हेटिव्ह कृषी उपकरणांचे सादरीकरण*आधुनिक शेती, स्मार्ट शेतीसाठी उपकरणांची आवश्यकता असते. कमी वेळ, श्रमात शेतीचे विविध कामे करण्यात येतात याबाबतची ६७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी ६७ नावीन्यपूर्ण उपकरणांची मांडणी जैन हिल्स येथील आकाश मैदावर केलेली होती. ही उपकरणे विशेष आकर्षणाची ठरले त्यामध्ये स्मार्ट इरिगेशन, गवत तण काढणी यंत्र, भूइमुगाच्या शेंगा फोडण्याचे यंत्र, कोंबडीशिवाय अंडी उबविण्याचे तंत्र, रात्रीच्यावेळी शेतात सायरन व फ्लश लाईट, सेन्सार पद्धतीने इरिगेशन, पिकांना फवारा पद्धतीने अशा एक ना अनेक उपकरणांची मांडणी करण्यात आलेली होती.
मान्यवरांची आकाश ग्राउंडवरील इनोव्हेटीव्ह शेती उपकरणांना भेटदरम्यान जैन हिल्स येथे आकाश ग्राऊंडवर मांडणी करण्यात आलेल्या नावीण्यपूर्ण शेती उपकरणांची पाहणी यूपीएलचे चेअमन रज्जू अर्थात रजनिकांत श्रॉफ, व्हाईसचेअरमन श्रीमती सान्ड्रा श्रॉफ, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, नॅन्सी बेरी यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी मांडणी केलेल्या इनोव्हेटीव्ह उपकरणांबाबत श्री. श्रॉफ, अशोक जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या उपकरणाची माहिती जाणून घेतली. फालीच्या संम्मेलनाबाबत आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये सुसंवाद साधला.*खेड्यातील मुलींचा सहभाग व त्यांचा सभाधीटपणा -*फालीच्या आठव्या संम्मेलनात महाराष्ट्र व गुजरात मधील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थीनींची संख्या आणि त्यांच्या आत्मविश्वासाने केलेल्या सादरीकरणाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थीच भविष्यातील शेतीतील खरेखुरे लीडर बनतील व शेतीच्या माध्यमातून सर्वांगिण प्रगती साध्य होईल याबाबत यूपीएलचे चेअरमन रजनिकांत श्रॉफ यांनी मत व्यक्त केले. भविष्यात २०३१ पर्यंत महाराष्ट्र व गुजरातमधील शाळांमधून सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू असे जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांनी सांगितले. या प्रेसमीटचे संचालन जैन इरिगेशनचे अनिल जोशी व फालीच्या रोहिणी घाटगे यांनी केले.