<
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात आठ ते दहा वर्षानंतर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर प्रथमच गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून गिरणा धरण शंभर टक्के भरली आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढलेली आहे. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांनी मोठ्या थाटात वाजत-गाजत गिरणा नदीची साडीचोळी खन आणि नारळाने ओटी भरुन पुजन केले. यावेळी नांद्रा बु.पोलीस पाटील नितीन सोनवणे, माजी चेअरमन एकनाथ सोनवणे, माजी चेअरमन विकास सोसायटी गणेश सोनवणे, ग्रा.प. सदस्य मच्छिंद्र सोनवणे, आदर्श शेतकरी बापू पुंडलिक सोनवणे, ग्रा.पं. पाणीपुरवठा कर्मचारी कैलास सोनवणे व विलास सपकाळे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सोनवणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.