<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- जळगाव जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक 2 ते 8 जून, 2022 असल्यामुळे शनिवार दिनांक 4 जून, 2022 व रविवार दिनांक 5 जून, 2022 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये नागरिकांकडून प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत शाखेमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (म.प्र.) शुभांगी भारदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.