<
एरंडोल ( ) – 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन संपूर्ण राज्यात साजरा करण्यासाठी एरंडोलला देखील आहारातून आरोग्याकडे-मोफत शरीर तपासणी आणि आहार मार्गदर्शन शिबीराचे एरंडोलला आयोजन करण्यात आले.
एरंडोलचे आरोग्यदूत-कोरोना योध्दा विक्की खोकरे,व आहार सल्लागार सौ.सविता पाटील यांनी सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात करण्यात आलेल्या कार्यक्रमाच अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त तहसिलदार तथा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरूण माळी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, गुजर समाज अध्यक्ष गोपाल पाटील होते. यावेळी प्रा. आर. एस. पाटील, राजेंद्र शिंदे सर, साळी समाज महिला अध्यक्षा शोभा साळी, ग्राहक कल्याण अध्यक्षा आरती ठाकूर, शेतकरी संघटनेच्या मालती पाटील, हर्षाली महाजन, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील, माजी उपनगराध्यक्ष शालिग्रामभाऊ गायकवाड, पत्रकार संजय चौधरी, कृष्णा हॉटेलचे संचालक कृष्णा धनगर, ज्येष्ठ नागरीक संघाचे, सुपडू शिंपी, जाधवराव जगताप, विश्वनाथभाऊ पाटील, नामदेवराव पाटील,विलास पाटील, आर के पाटील,आदींची उपस्थिती लाभली.
यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार नाशिकचे गोपाल गायकवाड, पुण्याचे पंकज देशमुख, नारायण ठोंबरे, चेतन बोर्डे, सविता पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. निरोगी जीवनासाठी मोफत शरीर तपासणी, आहार मार्गदर्शन, वजन कमी करणे अथवा वाढविणे यासाठी सल्ला, मार्गदर्शन, पोषक आहार, पोट आणि पाठीवरील चरबीचे प्रमाण यांचे संतूलन राखण्यासाठी, वय, उंचीनुसार वजन, स्नायूंची ताकद याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित नागरीक, महिलांनी लाभ घेतला. एरंडोलला प्रथमच अशाप्रकारचा अभिनव उपक्रम-मोफत राबविणार्या विक्की खोकरें व सविता पाटीलचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात कौतूक करून धन्यवाद दिलेत. महिलांनी अशाप्रकारच्या मार्गदर्शन उपचार पध्दतीचा लाभ घेवून वजन कमी केल्याची माहिती दिली.
अरूण माळी, प्रा. अहिरराव, रमेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्की खोकरे यांनी केले तर सूत्रसंचलन, आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पाटील, सविता पाटील,मयुर पाटील, अमिन मुजावर, शुभम गायकवाड, जितेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.
शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला