<
एकाच आठवड्यात तीन घटनेत बिरादरीला यश
कौटुंबिक कारणातून झालेल्या वादातून पत्नीला एकाच वेळी तलाक देऊन विवाह संबंध संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवऱ्याच्या प्रयत्नाला जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी ने एक नव्हे तर दोन प्रकरणी जून च्या पहिल्या आठवड्यात ब्रेक दिला आहे.
तर एका प्रकरणी घटस्फोटीत महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असणाऱ्या तरुणास त्या महिलेसोबत विवाह लावून देण्यास बिरादरी ला यश मिळालेले आहे.
या तिन्ही प्रकरणात बिरादरी ने धार्मिक न्यायनिवाडा केंद्र अकोला चे प्रमुख मुफ़्ती अश्फाक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चे निर्णय घेऊन तिघी विवाहितांना व त्याच्या सहा अपत्यांना न्याय दिलेला आहे.
तलाक संबंधांस ब्रेक- व निकाह ए साहनी
बर्हाणपूर येथील पति महोदयाने आपल्या तेरा वर्षानंतर च्या वैवाहिक जीवनात आपल्या पत्नीला वैवाहिक वादातून तलाक देण्याचा प्रयत्न केला असता त्याची मुलगी बारा वर्षे हिने आपल्या दोन बहिणी आठ व सहा वर्ष व भाऊ दहा वर्ष यांच्या माध्यमाने हा तलाक थांबवण्यासाठी बिरादरी कड़े प्रयत्न केला असता त्यात बिरादरी ला यश मिळाले यातील पति हे मध्यप्रदेशचे बर्हाणपूर येथील तर पत्नीही खिर्डी तालुका रावेर येथील रहिवासी आहे. तीसरा तलाक ला ब्रेक दिल्याने त्यांचा निकाह ए साहनी करून त्यांना शेवटची संधि मिळाली असून त्यांनी आपले वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत करावे म्हणून शुभेच्या देण्यात आल्या।
दुसऱ्या तलाक प्रकरणी ब्रेक
रावेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या दोघांना लग्नाला सात वर्षे झालेले होते .पाच वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी असतानासुद्धा वैवाहिक वादातून पत्नीला तलाक शब्द उच्चारल्या मुळे सदर प्रकरणी धार्मिक न्यायनिवाडा केंद्र अकोला व जळगाव येथून मार्गदर्शन घेऊन सदर तलाक ला ब्रेक देण्यात बिरादरी ला यश मिळाले असले तरी एक तलाक झालेला आहे याची कल्पना देऊन त्यांना वैवाहीक जीवन जगण्याची संधि प्राप्त झाली
तिसऱ्या प्रकरणात विवाह लावले.
बोदवड येथील विवाहितेला इच्छापुर येथील पतीने तलाक दिल्याने सदर घटस्फोटीत महिलेस एका तरुणाने आमिष दाखवून त्याच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवले ही बाब बिरदारीच्या निदर्शनास येताच सदर प्रकरणी मन्यार बिरादरीने त्या तरुणाला व घटस्फोटित महिलेशी चर्चा कली त्या नंतर त्यांच्या दोघांच्या पालकांशी बोलून त्यांचा विवाह लावून दिला असता दोघी कुटुंबीयां मधे प्रेम व स्नेहाचे संबंध निर्माण झाले। या विवाह प्रसंगी दोन्ही कडील मंडली उपस्थित होती।
या तिसऱ्या प्रकरणी विवाहाला ब्रेक देण्याचा काही लोकांचा प्रयत्न बिरादरी ने उधळून लावला व तो विवाह लावून दिला व त्या घटस्फोटित स्त्रीला न्याय मिळवून दिला.
या विवाहात उपस्थितांना बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांचे तर्फे स्नेह भोजन देण्यात आले.
अशाप्रकारे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बिरादरी च्या माध्यमाने दोन तलाक ला ब्रेक व एक अनोखा विवाह बिरादरी ने लावून दिल्याने या प्रकरणी महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील मनियार बिरादरित आनंद साजरा होत आहे.
धर्म गुरुचे मार्गदर्शन व बिरदारीचे प्रयत्न
दारुल कजा अकोला चे मुफ़्ती अशपाक व जळगाव दारुल कजा चे मुफ़्ती अतिकउर रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चाँद, सदस्य हारून शेख, सलीम मोहम्मद, सादिक मुसा, अल्ताफ शेख, अख्तर शेख , रउफ रहीम, ताहेर शेख आदींनी प्रयत्न करून हे घडवून आणले.