<
समता सैनिक दलाची जळगांव जिल्ह्यात गाव तिथं शाखा..घर तिथं सैनिक या उद्देशाने जळगांव जिल्ह्यात 1000 शाखा येत्या 2023 पर्यत जिल्ह्यात निर्माण करणार….
समता सैनिक दलाच्या जिल्हास्तरीय बैठकीत निर्धार…
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मार्च 1927 साली समता सैनिक दलाची स्थापना केली आहे. समता सैनिक दलाचे मुख्य ध्येय जात – पात – धर्म – पंथ यावरून कुठलाही भेदभाव न मानता सर्वांना समता सैनिक दलात सहभागी करून घेणे. या देशात सामाजिक विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणे. हे ध्येय समता सैनिक दलाचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे गाव तिथं शाखा …..घर तिथं सैनिक या आदेशानुसार जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा व प्रत्येक घरात सैनिक या ध्येयाने जळगांव जिल्ह्यात दौरा करून समाज जागृत करून गावातील छोट्या छोट्या संघटना बरखास्त करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटना मध्ये सहभागी होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ मजबूत करावी.
असे आव्हान तरुणांना करीत आहे. त्याच बरोबर देशात सध्या धर्माध परिस्थिती निर्माण झाली. या मुळे देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही संघटना कडून होत आहे. हा धोका लक्षात घेता. या देशातील भारतीयांना सुरक्षित वाटेल असे वातावरण समता सैनिक दल निर्माण करणार…या देशात फूट पडू दिली जाणार देशाच्या संविधान रक्षणासाठी समता सैनिक दल आहे. असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी समता सैनिक दलाच्या जिल्हास्तरीय बैठकीत केले.
समता सैनिक दलाची जिल्हास्तरीय बैठक दिनांक 14 जून 2022 रोजी जळगांव शहरातील पद्मालय विश्राम गृह या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिक चळवळ प्रचार बाबतीत सविस्तर चर्चा झाली. तसेच या बैठकीत समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक म्हणून जळगांव जिल्ह्यात चळवळीत सक्रिय सहभाग असणारे चेतन ननावरे यांची व महिला आघाडी जिल्हा संयोजक म्हणून वैशाली हेरोळे यांची निवड जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केली. सोबत जळगाव जिल्ह्यात व शहरात प्रचारक म्हणून पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. 1) जयेश खरात 2) विलास बोरीकर 3) शैलेश पाटील 4 ) कपिल जाधव 5 ) अशोक अडकमोल 6 ) संजय सपकाळे यांची निवड करण्यात आली. यांना जळगांव जिल्ह्यातील प्रत्येकी 2 तालुक्याची जवाबदारी देण्यात आली. पुढील महिन्याच्या जुलै महिन्यात समता सैनिक दलाची जिल्हास्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
बैठक यशस्वी साठी संजय निकम, श्रावण सपकाळे ,भैय्यासाहेब निकम , अंकुश अहिरे. भोजराज सोनवणे, रोहित पगारे यांनी मेहनत घेतली.
आभार जिल्हा प्रचारक चेतन ननावरे यांनी मानले.