<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.17- डाक विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी डाक विभागातर्फे डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांच्या कार्यालयात दि.28 रोजी दुपारी चार वा. पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दाखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालत मध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे जसे वारस इ. तसेच नाती आधारित सूचना / तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही यांची सर्वांनी नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी अधिक्षक डाकघर (मुख्यालय), जळगाव यांचेकडे संपर्क साधावा, असे अधिक्षक डाकघर, जळगाव यांनी कळविले आहे.