Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शासनाची शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.17-   सामूहिक / नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- (रुपये – दहा हजार मात्र) एवढे अनुदान देण्यात येते व सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वंयसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे रुपये – 2000/- ( रुपये दोन हजार मात्र) एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचा खर्च भागविण्याकरीता देण्यात येते.      

खालील अटींची पुर्तता करणाऱ्यास सदर योजनेचा लाभ मिळू शकेल

1)    वधू जळगाव जिल्हयाची स्थानिक रहिवाशी असावी, शेतकरी  असल्यास 7/12 चा उतारा व शेत मजूर असल्यास भूमीहीन शेतमजूर असल्याचा दाखला, उत्पन्नाची मर्यादा – वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखपेक्षा जास्त असू नये त्यासाठी उत्पनाचा दाखला, या कार्यालयाकडून सदर योजनेचा लाभ खुला व इतर मागास वर्गाच्या प्रवर्गासाठी देण्यात येतो. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाही कारण त्यांच्या साठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वंतत्र योजना राबविण्यात येत आहे.

2)    नोंदणीकृत विवाह ( Registered Marriage ) प्रमाणपत्र

3)   सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत विवाह करणारे जोडपे,  बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयाचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात रुपये 20/- च्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वंयसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक राहील. नोंदणीकृत एका स्वंयसेवी संस्थेस एका सोहळयात किमान 5 व कमाल 100 जोडप्याचा समावेश करण्याची परवानगी राहील.

अधिक माहितीसाठी – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जळगाव दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दुरवध्वनी क्रमांक – 0257-2228828वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डाक पेन्शन अदालत २८ जून रोजी

Next Post

वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

Next Post
प्रतिबंधीत अन्न पदार्थावर करावाई

वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo