<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.17- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2022-2023 मध्ये ज्या मदरसांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यात येते. तसेच पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देण्यात येत आहे. आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरीता पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदरचे मदरसा/मदरसे चालविणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इच्छूक मदरशांनी 11 ऑक्टोंबर, 2013 च्या शासन निर्णयानुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, अधिक माहितीसाठी सदरचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती जाणून घ्यावी. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जळगाव प्रताराव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.