<
वार्ताहर :- शिरसाड ता यावल येथील तरुण ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकी खरेदी विक्री संघाचे सर्वात कमी वयातील संचालक तेजस धनंजय पाटील यांचा वाढदिवस गावातील मित्र परिवाराकडून सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात आला. सकाळी 11 वाजता शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायन्स टेक्नॉलॉजीचे पुस्तकरुपी पेपर किट प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करण्यात आले. त्यासोबत खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगिता पाटील मॅडम, सौ.अर्चना शिंदे मॅडम, श्री. मोरे सर, श्री. अटवाल सर, श्री. चव्हाण सर, श्री. शेख सर, श्री. किशोर पाटील सर यासोबतच योगेश चौधरी, वासुदेव सोनवणे, पंकज खंबायत, गोलू चऱ्हाटे, विकास वाघ, बापू पाटील, नितीन कोळी, इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर संध्याकाळी गावाजवळील आदिवासी पाड्यावर फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेश सोनवणे, वासुदेव सोनवणे, प्रताप पाटील, भूनेष पाटील, विष्णू सोनवणे, श्रीकृष्ण शिरोळे, पांडुरंग पाटील, धनराज मराठे, प्रभाकर जाधव, नितीन कोळी, गोलू चऱ्हाटे, पंकज खंबायत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तेजस धनंजय पाटील मागील 8 वर्षापासून सामाजिक कार्यात काम करत आहेत. त्यांनी सामाजिक कार्याद्वारे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तेजस पाटील हे शिरसाड येथील मा. उपसरपंच श्री.धनंजय पाटील व जिल्हा परिषद शाळा शिरसाड येथील मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांचे चिरंजीव आहे.