<
जळगांव(धर्मेश पालवे) बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोण गावी येथील सम्राट अशोकाच्या काळातील बौद्ध स्तूप वाचविणे, बौद्धगया येथील विहार विकृती करणापासून व ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी व नागपूर येथील दीक्षाभूमीवरील घुसखोरी थांबविण्यासाठी या रॅलीचे आयोजन संपूर्ण भारतात करण्यात आले होते. दि १५/०९/२०१९ रविवार रोजी जळगाव जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले.या रॅलीचे नेतृत्व सारिपुत्र गाढे(जिल्हा संयोजक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क)यांनी केले या वेळी उपस्थित विजय सुरवाडे, एडव्होकेट सुकन्या महाले, सुकलाल पेंढारकर,खुशाल सोनवणे,मुकेश सावकारे, किशोर बिऱ्हाडे,जितेंद्र वानखेडे, प्रकाश इंगळे ,हरीश कुमार पाने ,सौ प्रेम लता पाने, रविंद्र सोनवणे, सरदार साहेब,सोनवणे साहेब ,जितेंद्र वानखेडे ,सौ वानखेडे, दिपाली पेंढारकर, शेखर पेंढारकर, सिद्धार्थ साठे, ऋषिकेश शिंदे, कोमल सोनवणे, पुनम वानखेडे, बेबीबाई सुरवाडे ,उज्वला सुरवाडे, गौतम सुरवाडे, गौरव सुरवाडे,विशाल आहिरे, रायसिंग साहेब आदि कार्यकर्ते तथा बौद्ध उपासक उपस्थित होते . या रॅली प्रदर्शनाला बहुजन क्रांती मोर्चा,संविधान बचाओ संघर्ष समिती, भारत मुक्ती मोर्चा,भारतीय युवा मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.