<
चोपडा-(प्रतिनिधी) – समाजकार्य महाविद्यालय चोपडा चे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर तसेच उपप्राचार्य प्रा.आशिष गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा डॉ अनंत देशमुख, प्रा.डॉ गायकवाड यांच्या उपस्थितीत चोपडा येथे भगिनी मंडळ चोपडा कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोसिएशन च्या वतीने MSW भाग 2 च्या विद्यार्थी यांच्याशी समाजकार्य शिक्षणा नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध क्षेत्रातील नोकरी विषयक मार्गदर्शन तसेच शासकीय, निमशासकीय तसेच NGO मध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी, संधी तसेच क्षेत्र कार्य करतांना येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांना समाजकार्य शिक्षण घेतांना प्रत्यक्ष तासिका व श्रेत्रकार्याच्या माध्यमातून आत्मसात करावयाची कौशल्ये व ज्ञान यांची व्यावसायिक जिवनातील उपयुक्तता यावर विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधण्यात आला.
त्याप्रसंगी भगिनी मंडळ चोपडा कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोसिएशन चे अध्यक्ष जितेंद्र महाजन, सचिव कमलेश पवार, खजिनदार भूषण कोळी, सदस्य रमेश कोळी, सदस्या धनश्री राजपूत आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार हितेंद्र माळी यांनी मानले.