<
जळगाव, (प्रतिनिधी)- भुसावळ येथील एका राहत्या घरात अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीर रित्या विक्री होतं असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळल्याने सापडा रचत दिनांक ५ रोजी कारवाई करून १ कोटी रुपयाचा गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, दिनांक ५ जुलै रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गुप्त बातमीदार करवी बातमी मिळाली की, तिने तालुका भुसावळ मनोज रोहीदास जाधव हा त्याचे राहते घरात गांजा हा मानवी जीवनास आपायकारक ठरणारा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन चोरटी विक्री करीत आहे. अशी गुप्त बातमी मिळाली होती.
दरम्यान पो नि किरणकुमार बकाले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, तसेच उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग सोमनाथ वाघ चौरे यांच्यासोबत छापा टाकण्यापुर्वी चर्चा करुन मार्गदर्शन घेवुन घेवुन नशिराबाद पो स्टे ला येऊन छापा टाकण्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद नशिराबाद यांच्याकडुन शासकीय पंच मिळवुन पो नि किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक तसेच नशिराबाद पो स्टे चे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल मोरे व पोलीस अंमलदार यांच्यासह बातमी प्रमाणे तिघे गांवात छापा टाकतला.
मनोज रोहीदास जाधव याच्या राहते घराचे मागच्या खोलीत मानवि जिवणास अपायकारक ठरणारा अंमली पदार्थ गांजा सुमारे ८८५ किलो अंदाजे ९,०६,२०,०००/- रुपये (एक कोटी सहा लाख विस हजार) किमतीचा मिळुन आल्याने ते जागीच जप्त करुन ताब्यता घेण्यात आले व इसम नामे राहुल काशिनाथ सुर्यवंशी वय २५ रा. वाडीशेवाडा ता पाचोरा यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो डॉ प्रविण मुंडे, मा, अपर पोलीस अधिक्षक सो श्री रमेश चोपडे, चार्ज जळगांव परिमंडळ, उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ भाग श्री सोमनाथ वाघ चौरे यांच्या मार्ग दर्शना खाली पो नि श्री किरणकुमार बकाले, सपोनि श्री जालींदर पळे, पोउनि श्री अमोल देवढे, सफो/ २४९२ युनुस शेख ईब्राहीम, नेम. स्थागुशा, जळगाव, सफी / २५०७ वसंत ताराचंद लिंगायत, सफौ/५८४ रवि पंढरीनाथ नरवाडे, पोहेकॉ/२७४१ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ/ २७१४ कमलाकर भालचंद्र बागुल, पोहेकॉ/९१५ अनिल गणपतराव देशमुख, पोहेकॉ / १२०६ दिपक शांताराम पाटील, पोहेकॉ/४७ अक्रम शेख याकुब, पोहेकॉ संदीप श्रावण साबळे पोना/१३७२ नंदलाल दशरथ पाटील, पोना/१४१६ विजय शामराव पाटील, पोना / ३०३२ भगवान तुकाराम पाटील, पोना/१४१८ नितीन प्रकाश बाविस्कर, पोना/ २५४६ प्रमोद अरुण लाडवंजारी, पोकों/ ८४४ ईश्वर पंडीत पाटील, पोकॉ/१४५४ लोकेश भास्कर माळी, चासफो/९३१ रमेश भरत जाधव, चापोहेकॉ / २७५४ विजय गिरधर चौधरी, चापोना / ६६४ दर्शन हरी ढाकणे, सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, तसेच नशिराबाद पो स्टेचे प्रभारी अधीकारी सपोनि श्री अनिल मोरे, पोउनि श्री राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ/१३२८ गजानन देशमुख, पोना/८११ किरण बाविस्कर, पोना/१४०८ रविद्रं इंधाटे, पोना/१८७८ सुधिर विसपुते पोना/ ३५४ समाधान पाटील पोकॉ/२११ विजय अहीरे, पोकों/३७७ दिनेश भोई अशांनी संयुक्त रित्या केली आहे.