<
जळगाव दि.8- 36 वर्षाची दिर्घ परंपरा पाठीशी असलेली खान्देशातील सर्वात जुनी व्यवस्थापन संस्था के सी ई चे आय एम आर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत परत दुसर्यांदा नॅक प्रमाणित झाली आहे. या प्रक्रियेत के सी ई चे आय एम आर ला A प्रमाणपत्र उच्च मुल्यांकनासह प्राप्त झाले आहे.
के सी ई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली, दुरदृष्टीने, धडाडीने संस्थेची विजयी पताका कायम उंचावत आहे . आय एम आर हि संस्था फक्त व्यवस्थापनच नाही तर संगणक क्षेत्रातील संपुर्ण खान्देशात आघाडीची संस्था म्हणुन कार्यरत आहे. संचालक म्हणुन प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांचे नेतृत्व संस्थेला विविध क्षेत्रात कायम पुढे नेणारेच शाबीत झाले.
संस्थेच्या 36 वर्षाच्या कार्यकाळात 32 वेळा आपले विद्यार्थी विद्यापीठात सर्वप्रथम ठरले आणि अर्थातच सुवर्णपदक विजेतेही..
आय आय एम कोझीकोड आणि कलकत्ता,बनारस विश्र्व हिंदू विद्यापिठ येथील स्पर्धांमधुनही आपले संघ अव्वल ठरले आहेत .
के सी ई चे आय एम आर पुनश्र A नॅक प्रमाणित होण्यामागे के सी ई चे व्यवस्थापन सदस्यांची प्रेरणा महत्त्वाची ठरली. नॅक समन्वयक म्हणुन डॉ तनुजा महाजन, यांनी हि धुरा प्रभावी पणे निभावली. कुठलेही यश ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असते. संस्थेतील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने हे यश सहज संपादन करता आले.