<
जळगाव दि.११ – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचा जिल्हा स्तरीय मेळावा दि १० जुलै २०२२ रोजी हॉटेल के पी प्राइड, स्टेशन रोड जळगाव येथे संपन्न
झाला .जिल्ह्यातील बहुसंख्य प्राध्यापक सभासद उपस्थित होते , सदर मेळाव्यात जळगाव जिल्हा कार्य कारणी निवडण्यात आली.
जळगांव जिल्हा कार्यकारिणी
अध्यक्ष –
प्रा. डॉ. योगेश महाले (मराठी विभाग, एम. जे. कॉलेज, जळगाव)
उप अध्यक्ष – (Mental and Moral Science)
प्रा. डॉ. साहेबराव पडलवार (नूतन मराठा महाविद्यालय, जळगांव)
उप अध्यक्ष (Languages)
प्रा. डॉ. नितिन इंगळे, (इंग्रजी, नूतन मराठा महाविद्यालय, जळगांव)
उप अध्यक्ष (Science and Technology)
प्रा. डॉ. संजिव बळीराम साळवे, (रसायनशास्त्र, मुक्ताईनगर)
उप अध्यक्ष (Commerce and Management)
प्रा. डॉ. अरविंद केशवराव राऊत, (जामनेर)
उप अध्यक्ष (Social Work)
प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे (समाजकार्य, चोपडा)
उप अध्यक्ष (Law)
प्रा. डॉ. जी. व्हीं धुमाळे, (एस. एस. मणियार विधी महाविद्यालय , जळगाव)
सचिव-
प्रा. डॉ. राहुल निकम,
(चोपडा)
सह-सचिव
प्रा. डॉ. दिलीप कदम,
(मारवड)
खजिनदार-
प्रा. डॉ. राजेश सगळगिळे (एम. जे. महाविद्यालय, जळगांव)
महिला प्रतिनिधि –
डॉ. पंचशीला वाघमारे, (मुक्ताईनगर)
निमंत्रित / सल्लागार / निवृत प्राध्यापक –
प्रा. के. के. वळवी, (एम. जे. कॉलेज, जळगाव).
संघटनेच्या मेळाव्यात मंजूर झालेले ठराव –
1.विद्यापीठाने सर्व विषयांचे शैक्षणिक प्रवेशाची सर्व कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांची निर्धारित केलेली फी वाढ कोरोणा उत्तर परिस्थिती ध्यानात घेवून कमी करावी आणि किमान १०० रू या रकमेत प्रवेश द्या .
२. प्रत्येक महाविद्यालयात असलेल्या आय क्यू ए सी समिती मध्ये मागास वर्गीय अनुभवी प्राध्यापक व्यक्तीचा समावेश करण्यात यावा.
३. ईतर राज्यात चालू केलेली जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात ही सुरू करावी.
४. डी सी पी एस योजनेत असलेल्या नियुक्त प्राध्यापक व्यक्तीचे एकच खाते असावे. एका शैक्षिणक विभागातून , दुसऱ्या विभागात गेल्यावर त्यांची जमा रक्कम त्या अन्वये पूर्वीचे खात्यात अडकून राहणार नाही.
५ समाजकार्य महाविद्यालयीन प्राध्यापक वर्गाचे प्रश्न विद्यापीठ स्तरावर प्रलंबित राहतात त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.