<
विद्यार्थ्यांनी केले खेळणीतून प्लास्टिक हद्दपार
जळगांव(प्रतिनीधी)- ‘स्वच्छ भारत मिशन’ या अंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानातंर्गत सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुळे पर्यावरणा वर होणाऱ्या विपरीत परिणामाची माहिती देण्यात आली. समस्त सजीवांना ते हानिकारक असून, ते पुढच्या पिढीला हानिकारक आहे. या अनुषंगाने व जळगांव जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या स्वच्छता हीच सेवा अभियानाला प्रतिसाद देत सरस्वती विद्या मंदिर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक पूरक खेळणी कागदाचे बॉल बनवून व प्लास्टिक पासून होणारी हानी बाबत माहिती दिली. तसेच येणाऱ्या भावी पिढीच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे .प्लास्टिक निर्मुलनसाठी व जळगांव जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली.या उपक्रमाचे आयोजन सरस्वती विद्या मंदिरच्या शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी केले.या उपक्रमाला शिक्षिका सविता ठाकरे यांनी सहकार्य केले व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वसाने यांचे मार्गदर्शन लाभले.