<
जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा व वसंतवाडी येथे विजचोरी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची घटना ताजी असतांना आज कानळदा क्षेत्रातील मौजे फुपनगरी, नंदगाव, फेसर्डी, नांद्रा बु. या गावातील सर्व आकडेबहाद्दर व विजचोरांवर आज महावितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत तब्बल 10 विजचोरांवर भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईच्या मोहिमेत कानळदा क्षेत्राचे अभियंता श्री. मयुर भंगाळे व त्यांचे सहकारी कर्मचारी श्री. संदीप चौधरी, श्री. प्रवीण कोळी, श्री. रवींद्र सपकाळे, श्री. अमोल पाटील, योगेश सपकाळे, गणेश काटे, चंद्रकिरण सोनवणे, किरण चव्हाण इत्यादी सहभागी होते. तसेच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की,यापुढे सदरची मोहीम तालुक्यातील इतर गावात ही सुरू ठेवण्यात येणार आहे. सदरची मोहीम जळगाव विभाग प्रमुख श्री. संजय तडवी साहेब व जळगाव तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता श्री. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात येत आहे.वरील मोहीमेत अडथळा व दहशत निर्माण करणाऱ्या वीज चोरांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन विद्यूत अधिनियम 126, 135 तसेच अरेरावी , दादागिरी व गुंड प्रवृत्ती ने वागून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या समाज कंटकांवर 353 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.