<
आजकाल शालेय शिक्षण व अभ्यासक्रम ऑनलाइन झाल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे परंतु प्रत्येक पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी लॅपटॉप घेणे परवडत नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला तुमच्या खिशाला परवडतील असे स्वस्तात मस्त लॅपटॉप घेऊन आलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे लॅपटॉप्स….
१) लेनोवो आयडियापॅड 3 क्रोमबुक :-
४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज व ११.६ इंची डिस्प्ले असणाऱ्या क्रोमबुक लॅपटॉप मध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी विविध पोर्ट्स मिळतील. प्रोसेसिंगसाठी यात इंटेल सेलेरॉन एन४०२० हा दमदार प्रोसेसर आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्ट वरून १९,९९० रुपयांना खरेदी करता येईल.
२) असुस क्रोमबुक फ्लिप :-
११.६ इंची डिस्प्ले असणाऱ्या या क्रोमबुक लॅपटॉपचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात फ्रंट आणि रियर कॅमेरा असण्याबरोबरच टचस्क्रीन व ३६० अंशी फ्लिप करण्याचे फीचर असून, ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेजचा हा लॅपटॉप २०,९९० रुपयांना खरेदी करता येईल.
३) असुस बीआर११०० :-
४जीबी रॅम व १२८जीबी असलेल्या ह्या सुपरफास्ट व मिलिटरी ग्रेड प्रमाणित लॅपटॉप मध्ये प्रोसेसिंगसाठी इंटेल सेलेरॉन एन४५०० प्रोसेसर देण्यात आलेला आहे. टचस्क्रीन, ड्युअल कॅमेरा व ३६० अंशी फ्लिप फिचर असलेला हा लॅपटॉप २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल.
४) इंफिनिक्स एक्सवन स्लिम :-
१४ इंची फुल एचडी डिस्प्ले असलेल्या या १.२४ किलोग्रॅम वजनाचा हा लॅपटॉप ५०व्हीएच मोठ्या बॅटरीसहित उपलब्ध आहे तसेच यात ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेजबरोबरच प्रोसेसिंगसाठी इंटेल आय3 10th जेन प्रोसेसर दिला असून, याची किंमत २९,९९० रुपये आहे.