<
ठाणे – (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा येथे सेवागौरव करणारी शिक्षण परिषद
कसारा केंद्राची सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षातील दुसरी शिक्षण परिषद जि.प. केंद्रशाळा कसारा नं 1 येथे बुधवार दि.27/07/22 रोजी संपन्न झाली व याच बरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा विकास हिवरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
जि.प.केंद्रशाळा नं 1,आनंदनगर व उर्दू कसारा नं 4 या शाळांनी संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान कसारा केंद्राचे कार्यक्षम केंद्रप्रमुख मा. अशोक मोरे सर यांनी भूषविले.
शिक्षण परिषदेची सुरुवात प्रतिमापूजन व ‘किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मीयले’ या इशस्तवनाने करण्यात आली.
अण्णा कोठवळ यांनी केलेल्या परिपाठ संचलनात संपूर्ण परिपाठ हा विदयार्थी सहभाग विरहित असा व आयोजक शाळांतील शिक्षकांकडून सादर करण्यात आला. खास करून कविवर्य सुरेश भट यांचे व आयोजक शिक्षक शरद कांबळे यांनी संगीत बद्ध केलेले ‘हे सकल जनांच्या देशा’ हे देशभक्तीपर समूहगीत व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावरील प्रश्नमंजुषा ही परिपाठाची आकर्षणे ठरली होती.
अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख अशोक मोरे, कसारा बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा. वाडेकर, माजी ग्रा.पं. सदस्या शिंदे मॅडम, शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, निमंत्रित मान्यवर व सर्व शिक्षक बांधव, सुंदर फळकलेखन करणारे शिक्षक दत्ता देसले, आयोजन कामी मोलाचे सहकार्य करणारे महेश पवार, कसारा येथील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, व्यापारी व हिवरे परिवाराचे आप्त, मित्र यांचे कार्यक्रम प्रसंगी यथोचित स्वागत करण्यात आले.
शरद कांबळे यांनी केलेल्या प्रास्ताविकात या शिक्षण परिषदे बाबत तिन्ही आयोजक शाळांची भूमिका मांडली.
कसारा केंद्राच्या अलिखित प्रथेप्रमाणे येत्या 30 जुलै रोजी नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रशाळा मुख्याध्यापिका सौ.मनीषा हिवरे मॅडम यांचा कसारा केंद्रशाळा शिक्षक वृंद यांच्या वतीने आण्णा कोठवळ, संतोष भोई, वैशाली मोरे, अनिता शिंदे, तसेच समस्त कसारा केंद्रातील शिक्षकांच्या वतीने प्रकाश आगीवले यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केले, तसेच हिवरे मॅडम यांचा सेवा व कार्यगौरव करणारे सन्मानपत्र प्रदान करून हृद्य सत्कार करण्यात आला.
कसारा केंद्रातील, गावातील व अन्य ठिकाणाहून हिवरे मॅडम यांच्या स्नेही व आप्तेष्ठ प्रकाश हिवरे, सुनंदा हिवरे,सुधाकर सोनवणे, असोलकर, प्रसाद महाले,विठ्ठल निचिते, वैभव जगे, केंद्रशाळेतील माजी शिक्षिका संगीता कांबळे, कसारा केंद्राच्या माजी केंद्रप्रमुख सपकाळे मॅडम, इत्यादींनी खास उपस्थित राहून हिवरे मॅडम यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या विषयी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
सौ.मनीषा हिवरे मॅडम यांचा सेवा व कार्यगौरव करणारी यशोगाथा पुस्तिका स्वरूपात उपस्थित शिक्षण परिषदेचे मा. अध्यक्ष महोदय व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. हिवरे मॅडम यांच्या सेवा कार्याच्या गौरवार्थ शरद कांबळे यांनी गायलेल्या बिते हुवे लमहो की कसक साथ तो होगी’ या गीताने उपस्थित सद्गदित झालेले दिसले.
ठाणे पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका दीपाली घुले यांनी शांताराम घुले यांचेसह आवर्जून उपस्थित रहात सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना व शुभेच्छा देत पतपेढीची देय रक्कमेचा चेक हिवरे मॅडम यांना सुपूर्द केला. पतपेढी संचालक भरत मडके यांनी देखील आवर्जून उपस्थित राहून हिवरे मॅडम यांना सेवापूर्तीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
कसारा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननिय वाडेकर यांनी देखील हिवरे मॅडम यांच्या सेवा कार्याबद्दल प्रशंसोदगार काढून हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. याच सोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने नियोजन व कृती आराखडे बनवणे, मिशन झिरो ड्रॉप आऊट तसेच महत्वपूर्ण असे प्रशासकीय मार्गदर्शन केले.
सेवापूर्तीनिमित्त होत असलेल्या सत्कारास उत्तर देताना सौ.मनीषा हिवरे मॅडम यांनी सेवेत सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक, अधिकारी, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख मोरे सर यांनी मनीषा हिवरे मॅडम यांच्या सेवेबद्दल व व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रशंसोदगार काढून शुभेच्छा दिल्या व मिशन झिरो ड्रॉप आउट, घरोघरी तिरंगा तसेच अन्य अनेक महत्वाच्या विषयांबाबत प्रशासकीय मार्गदर्शन केले.
सौ. मनीषा हिवरे मॅडम व त्यांच्या परिवाराकडून शिक्षण परिषदेस उपस्थित सर्वासाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याबद्दल सौ.मनीषा हिवरे मॅडम व परिवार यांना उपस्थिताकडुन आभारपर शुभेच्छा दिल्यात.
आभार प्रदर्शनानंतर मा. अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने शिक्षण परिषदेचा समारोप करण्यात आला.
शिक्षण परिषद आयोजन,नियोजन व कार्यवाही यात केंद्रशाळा मुख्याध्यापिका मनीषा हिवरे , ललिता गांगुर्डे, हेमलता शिंदे,मोहोपत श्यामकुवर,संतोष भोई ,संध्या शिंदे,वैशाली मोरे, कुमुदिनी पाटील,संतोष भोई,अण्णा कोठवळ,प्रदीप खवले,अंकुश माळी, दत्ता रोंघे,छाया खंडागळे,रघुनाथ काकडे, आनंदनगर शाळेतील शरद कांबळे, भाऊराया चौधर, उर्दू कसारा 4 मधील इरफान अली सैयद,इम्रान शेख,सईदा बानो शेख या शिक्षक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी कसारा केंद्र शाळेतील शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या बचत गट महिला भगिनी व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार याठिकाणी व्यक्त करण्यात आले. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य निरामय सुखपूर्ण, आनंददायी राहो या शब्दसुमनांनी कसारा केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने हिवरे मॅडम हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.