<
रोजगार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क सेवा पदांच्या २२८ जागांच्या भरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुरुवात दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी होईल तसेच या सेवा पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २२ ऑगस्ट २०२२ ही राहील.
याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-
◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय = ०६
२) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क = ०९
३) कर सहाय्यक, गट-क = ११४
४) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क = ८९
५) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क = १०
एकूण = २२८
◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१:- अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.२:- पदवीधर.
पद क्र.३:- १) पदवीधर.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
पद क्र. ४:- १) पदवीधर.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
पद क्र.५:- १) पदवीधर.
२) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
◆ शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक) – १) पुरुष:- उंची १६५ से.मी. तसेच छाती – ७९ सेमी व फुगवून ०५ सेमी जास्त.
२) महिला:- उंची १५५ से.मी. तसेच वजन – ५० कि.ग्रॅ.
◆ वयाची अट – ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी, (मागासवर्गीय /आ.दु.घ / अनाथ: ०५ वर्षे सूट)
पद क्र.१, ४ व ५:- १९ ते ३८ वर्षापर्यंत.
पद क्र.२ व ३:- १८ ते ३८ वर्षापर्यंत.
◆ परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील ३७ केंद्र.
◆ शुल्क – खुला प्रवर्ग: ₹३९४ (मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग: ₹२९४, माजी सैनिक: ₹४४)
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख –
२२ ऑगस्ट २०२२ (मध्यरात्री ११.५९ वाजेपर्यंत)
◆ संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुरुवात – ०१ ऑगस्ट २०२२
◆ संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.mpsc.gov.in/
अर्ज करताना आवश्यक बाबी :-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.mpsc.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.