<
जळगाव-जिमाका-आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने ३१ ऑगस्ट रोजी मतदार याचीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नांव मतदार यादीत असले बाबतची खात्री करून घ्यावी. आपले नाव मतदार यादीतून वगळले गेले असल्यास, फॉर्म क्रमांक ६ भरुन त्वरीत आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत नाव नोंदणी करून घ्यावी अथवा www.nvsp.com या संकेत स्थळावर नाव नोंदणी करावी, अधिक माहितीसाठी तहसिल कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, मतदानाच्या दिवशी आपली कुठल्याही प्रकारे तक्रार विचारात घेतली जाणार नाही असे तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी १३, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.