<
जळगांव(धर्मेश पालवे):- येथील पाचोरा तालुक्यातील आखतवाडे या गावी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते तथा RTI प्रचारक मा.मुरलीधर परदेशी यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांना शासकीय निधी व साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी परदेशी यांनी पाचोरा पंचायत समितीवर या मागणी साठी मोठा मोर्चा काढला होता.आणि आज पर्यंत त्यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा सुरू ठेवला होता, आज त्याला यश आले आहे.
जिल्हापरिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१मधील अनुसूचि १ मधील व जिल्हा परिषद च्या अनुसूचि २नुसार आप आपल्या समितीच्या स्व-उत्पन्नातून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे, या माध्यमातून विविध योजनांतून ५%निधी हा दिव्यांग महिला, पुरुष व बालकां जसे अंध ,अपंग, मतिमंद, अस्थिव्यंग, आणि बहूविकलांग यांना अनुदाणाचा लाभ देने अपेक्षित आहे.आखतवाडे ता पाचोरा येथे ग्रामपंचायत तर्फे अपंग बांधवाना शासकीय निधीतुन वयक्तिक लाभाचे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येऊन ते वाटप केले गेले,तर अनुदान हे धनादेश स्वरूपात देण्यात आले. सदर निधी हा गेल्या ८ते९ वर्ष पासून पडून होता, जो आज पर्यंत दिला गेला नव्हता.या साठी आखतवाडे येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, व गावकरी यांनी सहकार्य केले तर या कार्यक्रमात लाभार्थी सह गावकरी मोठया संख्येनं हजर होते.