<
जळगाव – (प्रतिनिधी)
शहरातील एमआयडीसी येथे एका गोडाऊन किपरने काम करत असलेल्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पाटील (रा. जगवानी नगर, जळगाव) असे या गोडाऊन किपरचे नाव असून, त्याने नितीन कुलकर्णी (वय ४२, रा. पिंप्राळा परिसर, निसर्ग कॉलनी, जळगाव) यांच्या एमआयडीसी येथील ३२ एक्स सेक्टरमध्ये विजय ॲग्रो सेंटर या कंपनीमध्ये काम करत असताना जून २०२१ ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान कंपनीचे बनावट फॉर्म तयार करुन ४४ लाख ७३ हजार ६२८ रुपये किंमतीच्या विविध विद्राव्य खते, बियाणे तसेच कीटकनाशके इत्यादी मालाचा अपहार केला.
सदर कंपनीचे मालक नितीन यांच्या हे प्रकरण लक्षात आल्यावर सोमवारी १ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामगार पंकज पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उप.नि. रविंद्र गिरासे करीत आहेत.