<
वृक्ष लागवड व जतन काळाची गरज – पो. उपअधीक्षक श्री.संदिप गावित
जळगांव (प्रतिनिधी) – भारत सरकार संचालित नेहरू युवा केंद्र, जळगांव संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस मुख्यालय परिसरात अशोक, पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, शिसम, वड, चिंच, यासह जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारे १०० वृक्ष लागवड करण्यात आले.
वृक्ष रोपणाप्रसंगी वृक्ष लागवड व जतन करणे ही काळाची गरज असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री.संदिप गावित यांनी मनोगतात व्यक्त केले.
आगामी काळासाठी पर्यावरण बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असे मनोगत मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक श्री.नागेश सोनार यांनी मुलगी कुं.कनिष्का व वडील प्रल्हाद सोनार यांचा वाढदिवसानिमित्त अनमोल सहकार्य केले.
पोलीस उपअधीक्षक श्री.संदिप गावित व कुं.कनिष्का सोनार यांचा हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित राखीव.पो.निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, भगीरथ इंग्लिश स्कूलचे हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर, जळगांव जिल्हा महिला समितीच्या निवेदिता ताठे, मौलाना आझाद
अल्पसंख्याक फाऊंडेशनचे संस्थाध्यक्ष फिरोज शेख,भगीरथ इंग्लिश स्कूलचे शिक्षक नागेश सोनार, सहा. पोलिस निरीक्षक मांगीलाल पावरा,आकाश सोनवणे, भार्गव सोनार, भारत गोरे,आदींच्या उपस्थितीत वृक्षा रोपण करण्यात आले.
वृक्षरोपण करिता सोपानदेव पाटील (पो. प्रशिक्षक),देविदास वाघ (पो. प्रशिक्षक),राजेश वाघ ,हरीश कोळी, संतोष सुरवाडे,अजित तडवी,आशिष चौधरी,दिपक पाटील,रज्जाकअली सैय्यद,दिव्या मराठे,सुभाष धिरबक्षी यांचे अनमोल सहकार्य लाभले. नवीन पोलीस कर्मचारी आदींचे परिश्रम लाभले.