<
सिने जगत
अनेक मराठी मालिका, नाटके व चित्रपटांतून आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्व व प्रभावी अभिनय शैलीने रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्यामुळे त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिकामध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नाटकांमध्येही काम केले. त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकात केलेली ‘भैया’ ही भूमिका विशेष गाजली. त्याचबरोबर त्यांनी एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, वन टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला व नवरा माझा नवसाचा अशा विविध मराठी चित्रपटांतही काम केले.
अशा या हरहुन्नरी नटाचे गिरगाव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून, त्यांना अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.