Saturday, June 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!

user by user
09/08/2022
in क्राईम, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

आसाम – (प्रतिनिधी)

असे म्हणतात, ‘प्रेम आणि युद्धात सर्व काही न्याय्य आहे’ प्रेमात काही जण इतके आकंठ बुडालेले असतात की, आपण नेमके काय करत आहोत, याचेही त्यांना भान नसते. आसाम येथे घडलेल्या अशाच एका घटनेत एका प्रेयसीने स्वतःच स्वतःला तिच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रियकराचे रक्त इंजेक्शनमार्फत टोचून घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या सुआलकुची येथे घडलेल्या या घटनेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून हाजोच्या सतडोला येथे राहणाऱ्या एका मुलाशी झाली. हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तद्नंतर या मुलीला तिचा प्रियकर एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळाले.

यानंतर मुलीच्या पालकांना तिच्या प्रेमसंबंधाची व तिचा प्रियकर एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची कुणकुण लागताच मुलीच्या पालकांनी तिच्या प्रेमप्रकरणाला विरोध करीत प्रियकराला न भेटण्याची सक्त ताकीद दिली.

तरीही प्रेमात आकंठ बुडालेली ही अल्पवयीन मुलगी बऱ्याच वेळा तिच्या प्रियकराला भेटली. एवढेच नव्हे तर तिने त्याच्यासोबत पळून जाण्याचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मुलीचे पालक मुलीला स्वतःहुन परत घेऊन आले.

यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलत इंजेक्शनमार्फत तिच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रियकराचे रक्त सुईमार्फत स्वतःला टोचून घेतले, जेणेकरून दोघांना कोणीही एकमेकांपासून वेगळे करू शकणार नाही.

दरम्यान, मुलीचे हे भयानक कृत्य तिच्या पालकांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून, या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली व मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे.

user

Previous Post

ज्येष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड; मराठी सिनेसृष्टीत शोककळा

Next Post

तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) मध्ये १०९ जागांसाठी भरती

Next Post

तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) मध्ये १०९ जागांसाठी भरती

Comments 1

  1. Pingback: धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित महाविद्यालयात "सामुहिक राष्ट्रगान करुन "स्वराज्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo