<
सुरत – (प्रतिनिधी)
अलीकडेच पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे सुरत येथील वस्त्रोद्योगाला सुगीचे दिवस आले असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात ‘हर घर तिरंगा’ च्या अनुषंगाने गुजरात व सुरत येथील कापड उद्योगाचा ४०० कोटींचा व्यवसाय झाला आहे.
या मोहिमेअंतर्गत एकट्या सुरतमध्ये ८ कोटी ध्वज बनवण्यात आले. एकाच महिन्यात झालेल्या या अधिक व्यवसायामुळे सुरतमधील कापड व्यवसाय तेजीत आहे. यामुळे हजारो कारागीरांना रोजगार व उत्पन्न प्राप्त झाले आहे. यात बहुतांश तिरंगा ध्वज हे २० x ३० आणि १६ x २४ या आकाराचे तयार केले गेले आहेत.
दरम्यान, हे सर्व ध्वज बनविण्यासाठी सॅटिन ग्रे आणि मायक्रो ग्रे हे फॅब्रिक वापरण्यात आले असून, तब्बल ४० कोटी ध्वजांची निर्मिती व वितरण करण्याचा सरकारचा मानस आहे.