<
जळगाव-(जिमाका) – आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे कामकाज सुरळीतपणे पार पडावे. याकरीता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 28 अ, 159 व 134 मधील तरतुदींचा वापर करून राजकीय पक्ष/उमेदवारांना निवडणूकीसाठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी एक खिडकी केंद्र व विविध परवानग्यांसाठी परवानगी देणारे अधिकारी निश्चित केले आहे. यामुळे राजकीय पक्ष/उमेदवारांना परवानग्या/परवाने विविध कार्यालयात जाऊन मिळविण्याची गरज भासू नये, वेळेची बचत व्हावी, एकाच ठिकाणी परवानग्या मिळाव्यात. यासाठी तहसिल कार्यालय, एरंडोल येथे एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांनी दिली आहे.
एक खिडकी सुविधा केंद्र मध्ये उपलब्ध परवाने/परवानग्या, परवानगी देणारे अधिकारी व परवानगीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अनुक्रमे असे आहेत. 1) चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहिरसभांसाठी संबंधित कार्यक्षेत्राप्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, अर्ज, जागामालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायत/नगरपालिकांचे नाहरकत दाखला. 2) पोस्टर्स/झेंडे/बॅनर्स इत्यादि सभेच्या ठिकाणी लावणेसाठी संबंधित नगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित मुख्याधिकारी नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीसाठी संबंधित ग्रामसेवक, अर्ज, जागामालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायत/नगरपालिकेचा नाहरकत दाखला. 3) खाजगी जागेवर जाहिरात फलक लावणे (कटआऊट वगळून) – संबंधित नगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित मुख्याधिकारी, ग्रामपंचायत हद्दीसाठी ग्रामसेवक, अर्ज, जागामालकाचे संमतीपत्र. 4) प्रचार वाहन परवानगी देणे. 16-एरंडोल विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासाठी – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, एरंडोल व पारोळा. अर्ज, वाहनमालकाचे संमतीपत्र, वाहन नोंदणीपत्र, वाहन विम्याचे वैध प्रमाणपत्र, वाहनाचे वैध प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालकाचा वैध परवाना. 5) प्रचार कार्यालयाची परवानगी – संबंधित कार्यक्षेत्राप्रमाणे संबंधित प्रभारी स्टेशनचे अधिकारी, अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, नगरपालिका /ग्रामसेवकांचा नाहरकत दाखला. 6) हेलीपॅडवर हेलीकॉप्टर उतरविणे – संचालक नागरी विकास विमान सेवा-अर्ज, मा.जिल्हाधिकारी/पोलीस अधिक्षक/कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे नाहरकत प्रमाणपत्र, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचा नाहरकत दाखला. 7) ध्वनीक्षेपकाची परवानगी -संबंधित कार्यक्षेत्राप्रमाणे संबंधित प्रभारी पोलिस स्टेशनचे अधिकारी – अर्ज, वाहन चालकाचा वैध परवाना. 8) मिरवणूक/रोड शो/ रॅलीज – संबंधित कार्यक्षेत्राप्रमाणे संबंधित प्रभारी स्टेशनचे अधिकारी-अर्ज, (मिरवणुक/रॅलीज ठिकाण नमूद केलेला). 9) केबल जाहिराती परवानगी – जिल्हा निवडणूक अधिकारी/(Media Certification & Monitoring Committee)-विहित नमुन्यामध्ये अर्ज, जाहिराती मजकूर स्वरूपात अथवा ध्वनी मुद्रीत/रेकॉर्डींग सी.डी. स्वरुपात अशा प्रमाणे आहेत.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर परवानगी देणेकामी एक खिडकी केंद्र म्हणून पथकाची नेमणूक (श्री. सोनार, नायब तहसिलदार, एरंडोल यांच्या पर्यवेक्षणाखाली व तहसिलदार, एरंडोल यांच्या नियंत्रणात करण्यात आलेली आहे .
तरी निवडणूक संबंधित कामकाजासाठी अधिक माहितीसाठी तहसिल कार्यालय, एरंडोल येथे स्थापित एक खिडकी सुविधा केंद्र किंवा तहसिलदार, एरंडोल यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी 16-एरंडोल विधानसभा मतदारसंघ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.