Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वैरण (चारा )घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

लोहारा (प्रतिनिधी )- येथे ता. ११रोजी येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली असून संपूर्ण लोहारा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नीलेश पाटील,वय 25 हा गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास गुरांना वैरण टाकण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याला सर्फ दवश झाल्याची घटना घडली, त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याची प्राणजोत मालावली. नीलेश सुधीर पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नीलेश हा सकाळी शेतात जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेला होता. मात्र वैराणाखाली असलेल्या विषारी सर्पाने दंश केला. त्या दरम्यान त्याला चक्कर यायला लागले. त्याच अवस्थेत तो घरी चालत आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून नीलेशची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव जात

असताना रस्त्यातच नीलेशची प्राणजोत मावळली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नीलेशला तपासणीअंती मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेहाला लोहारा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलेशने जळगाव येथे डी. फार्मची पदवी घेतली होती. तो गोवा येथे नोकरीसाठी गेला होता.

सुट्टी असल्याने तो गावी आलेला होता. नोकरी करून घर बांधेल, असे तो घरच्यांना सांगत होता. असे वडील टाहो फोडत सांगत होते. खूप मोठी स्वप्ने बघितली होती. नीलेशच्या जाण्याने सर्व धुळीस मिळाली. नीलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याने सर्वांची मन जिंकून घेतली होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नीलेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बॅंकेत FD करताय? मग RBI चे नवीन नियम वाचलेत का…?

Next Post

फळबाग अनुदान व कोरडवाहू अनुदानाचे बोगस वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी – छावा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे

Next Post

फळबाग अनुदान व कोरडवाहू अनुदानाचे बोगस वाटप करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी - छावा जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo