<
जळगाव – (प्रतिनिधी) – दि. (13 ऑगस्ट ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 किमी महिला मॅरेथॉन स्पर्धेत राज्यभरातून 700 मुलींनी सहभाग नोंदविला होता. खानदेशाच्या इतिहासात पहिल्यांदा भव्य दिव्य महिला मॅरेथॉन चे आयोजन केले गेले होते. जळगाव येथे आयोजित या स्पर्धेत भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय पाळधी येथील 45 विद्यार्थिनींनी सहभागी होत्या.
त्याबद्दल महाविद्यालयात त्या विद्यार्थिनीसाठी कौतुक सोहळा घेण्यात आला.यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. मॅरेथॉन मध्ये महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीनी जोरदार संघर्ष करत पहिल्या वीस मध्ये येण्याचा मान मिळविला.तर इतर विद्यार्थिनींनी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. याप्रसंगी मा.दादासाहेब प्रतापदादा पाटील यांनी सहभागी खेळाडूनां पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक .मा.डी. डी. कंखरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर सर यांनी मनोगतातून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.