<
जळगाव, दि.१४ – देशभर आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात असून हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे जळगावातील पिंप्राळा हुडकोत रॅली काढण्यात आली तर शनिपेठ परिसरात तिरंगा वितरण करण्यात आले.
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहे. पिंप्राळा हुडको परिसरात नेहरू युवा केंद्र आणि ज्ञानसाधना माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढण्यात आली होती. संपूर्ण परिसरात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची जनजागृती करीत राष्ट्रध्वजाचे महत्व पटवून देण्यात आले.
रॅलीसाठी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया भोळे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका राजश्री महाजन, धनराज बंगाळे, विक्रम महाजन, हिरालाल चौधरी, तडवी सर, सुनंदा अत्तरदे, वैजयंती भोळे, दीपमाला जोशी यांच्यासह राष्ट्रीय युवा स्वयंसेवक शुभांगी वारके, रोहन अवचारे , हेतल पाटील, युथ क्लब मेंबर मयूर सोनवणे, विशाल खैरनार, रोहित सोनवणे, शंकर बारसके , सिद्धार्थ सोनवणे, पवन बाविस्कर आदी उपस्थित होते.
शनिपेठ परिसरात शनिमंदिरजवळ नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून तिरंगा वाटप करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, युवराज सोनवणे, रेखा सोनवणे, नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील, रोहन अवचारे आदी उपस्थित होते. परिसरातील महिलांनी तिरंगा घेत ‘भारत माता की जय’, वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणला होता. परिसरातील महिलांना तिरंगा वितरण करून तिरंगाचे महत्व सांगण्यात आले. हर घर तिरंगा मोहिमेची जनजागृती करण्यात आली.