<
लोहारा. (ईश्वर खरे) धी शेंदुर्णी सेकं एज्यु को-ऑप सोसा द्वारा, संचलित डॉ. जे. जे .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, ता. पाचोरा विद्यालयात आज 15 ऑगष्ट 2022 सोमवार रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत असून शासन याप्रसंगी आजादी का अमृतमहोत्सव देशाचा स्वांतत्र्याचा अमृतमहोत्स्व साजरा करत आहे . याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व देश भक्ती पर गीते सादर केली. तसेच थोर नेते क्रांतिकारक समाजसुधारक यांच्या वेशभूषा व केशभूषाही साकारल्या होत्या.
सुरुवातीला भारत मातेचे पूजन शेंदुर्णी सेकं एज्यू सोसायटीचे जेष्ठ संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील ध्वजारोहण विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित व्यापारी आप्पासाहेब माणिक शेठ कासार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्काऊट गाईडचेही ध्वजारोहण स्काऊट गाईड संघाद्वारे करण्यात आले.
कार्यक्रमास गावातील निवृत्त सैनिक सुभाष पाटील (गोंधळे ), आजी सैनिक भिका जाधव, पंकज पाटील ,चंद्रकांत गीते, सरपंच अक्षय जैस्वाल, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, अमृत चौधरी ,हिरालाल जाधव ,अशोक क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, अशोक चौधरी, अर्जुन पाटील, तर गावातील नागरिक गुणवंत सरोदे ,विजय दशरथ चौधरी, आबा सोनवणे, विश्वनाथ बोरसे ,अशोक बोरसे,युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार कासार, गजानन कासार, विजय चौधरी ,पत्रकार ईश्वर खरे गजानन क्षीरसागर, विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक जोशी सर, लिंगायत सर ,महिलांमध्ये सौ. सोनाली सोनवणे ,सौ .मंगला माळी, विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आर. एस .परदेशी , पर्यवेक्षिका सौ. यु .डी .शेळके , ज्येष्ठ शिक्षक पी. एम .सुर्वे ,एस एस गुजर ,आर जी बैरागी ,के एम पाटील, वाय पी वानखेडे, आर के सुरवाडे ,एन व्ही बोरसे ,एस बी सावकारे ,जे आर भालेराव, एस डी पाटील, सोनार सर, पी एम पाटील, सरोदे भाऊसाहेब इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व वस्तीगृह कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थी गुणगौरवाच्या कार्यक्रमाने उपस्थित नागरिक भारावून गेले. व त्यांनी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे कौतूक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही. एम .शिरपुरे सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.