<
जळगांव(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१९पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील १ ते १५ हे दिवस स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्यात आले , यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ हे मिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमाचे नियोजन शिक्षक मनोज भालेराव यांनी केले. यात चित्रकला, पोस्टर्स, वक्तृत्व, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमाला विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी मार्गदर्शन करून स्वछतेचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी सचिव सचिन दुनाखे, मुख्याद्यापक मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी शिक्षक रमेश ससाणे, पंकज नन्नवरे, शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.