<
जळगाव – (प्रतिनिधी) – १५ ऑगस्ट २०२२ जळगांव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वतंत्रता दिवस जल्लोषात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. राकेश चौधरी आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेचे कर्मचारी वृंद महाविद्यालय परिसरातील नागरिक उपस्थित होते.
७:४५ मिनिटांनी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्राचार्य राजेंद्र वाघुळदे यांनी स्वतंत्रता दिवस पर संदेश देताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर स्वातंत्र्यसैनिक , आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपला जीव ओवाळून टाकणारे आपले सैनिक आणि सामाजिक जीवन जगत असताना सामाजिक ऐक्य अबाधित राहण्यासाठी थोर विचारवंत यांचे स्मरण करुन मानवंदना देऊया.
भारत देश हा विश्व संस्कृतीचे उगमस्थान आहे. जागतिक स्तरावर मानवाने केलेल्या संशोधनांचा विचार केल्यास त्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे. भारताने जगाला अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रात आपल्या देशाचे अमूल्य आणि एकमेव असे योगदान आहे. यांतूनच आपल्या देशाचा अखिल विश्वावर अद्वितीय ठसा उमटवलेला असल्यामुळेच जागतिक स्तरावर आपल्या देशाला जागाच्या पाठीवर महाशक्ती होण्याकरीता उदयोन्मुख देश म्हणून भारत देशाला मान्यता मिळाली आहे.
हि एक बाजू असुन आणि दुसरी बाजू हि , यशस्वीतेच्या शिखराकडे प्रवास करतानां काही सामाजिक प्रश्न आजही अनुत्तुरीत आहेत. आणि अशा सामाजिक प्रश्नांमुळेच आपल्या देशाच्या विकास प्रवाहा सोबतच अनेक प्रश्न हे आजही सुटले नाहीत याचा देखील चर्चा होताना आपल्याला दिसतात. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सा निमित्त आपण सारेच शपथ घेऊया उजागर सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण सारेच एकत्र येऊया असे प्रतिपादन केले.
बी.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षाची विद्यार्थ्यांनी रिद्धी कापडे हिने स्वरचित कविता सादर केली. इंग्लिश मीडियम स्कूल मधील बाळ गोपाळानी थोर स्वातंत्र्य सेनानी , झाशीची राणी , भारत माता, सैनिक , विविध वेशभूषा करून देशभक्तीपर संदेश दिले.
ध्वजारोहण सोहळ्याचे समन्वय क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी. आर. चौधरी (नाना) डॉ. योगेश महाजन यांनी केले.
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांच्या संयुक्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले गेले.
स्वतंत्राचा दिवस साजरा करण्यासाठी ९२ वर्षाच्या आजी समवेत महाविद्यालय परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.