<
स्तुत्य उपक्रमाबद्दल सौ रोहिणी ताई खडसेंचे केले कौतुक
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा फायदा आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर पावसात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जमलेली मोठी गर्दी हाच माझ्यासाठी फार मोठा सत्कार आणि सन्मान आहे, असे प्रतिपादन करुन आ. अनिल पाटील यांनी केले. ज्यांच्या शब्दाने निवडून आले अशा पवार साहेबांना जो झाला नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो झाला नाही तो सामान्य कार्यकर्त्यांना काय होणार?असे सांगून, “पलटी मारणारा माणूस” आ.चंद्रकांत पाटील असल्याची टीका देखील यावेळी आमदार पाटील यांनी केली.
स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टचा मुहूर्त साधून रोहिणीताई खडसे यांनी संपूर्ण मतदारसंघात संवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेची सुरुवात बोदवड तालुक्यातील राऊत झिरा येथे महादेव मंदिरात दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली ही यात्रा आज राऊत झीरा,शेवगा, धोंडखेडा,कुऱ्हा-हरदो अश्या चार गावांमधे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे,अमळनेरचे आमदार अनिल पाटील,संदीप पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील मुक्ताईनगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष यु डी पाटील, यात्रा प्रमुख ईश्वर भाऊ रहाणे,निवृत्ती भाऊ पाटील,बोदवड तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, रावेरचे तालुकाध्यक्ष विशाल कोंडे आदींसह रामभाऊ पाटील भागवत टीकारे, कैलास चौधरी जि प सदस्य निलेश पाटील, बी सी महाजन, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील,अनिल पाटील सुधीर तराळ,विलास धायडे, सोपान पाटील, प्रल्हाद बोंडे, विशाल महाराज,खोले राजेश वानखेडे, विनोद कोळी,किशोर गायकवाड, भरत आप्पा पाटील,रामदास पाटील, दीपक पाटील,महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष अश्विनी पाटील बोदवड शहराच्या उपाध्यक्ष कविता गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या आत्याचे निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी पक्षनेते शरदचंद्रजी पवार यांनी नाथाभाऊंवर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा ग्रीन सिग्नल मला खडसे साहेबांनी दिला म्हणून मी आमदार होऊ शकल्याचे यावेळी बोलतांना आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना आमदार एकनाथराव खडसे यांनी विरोधकांना विकासाची स्पर्धा करण्याचे आवाहन केले. कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना फक्त आणि फक्त जनसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या निवारण कशा करता येतील या उदात्त हेतूने रोहिणीताईंच्या मनातील जनसंवाद यात्रेस आज शुभारंभ होत आहे. यात्रेच्या माध्यमातून १८२ गावातील मतदारांशी संपर्क साधला जाईल संपूर्ण कार्यक्रमांतर्गत नव्याने किमान ३० हजार सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे “वन बूथ थर्टी युथ” ही संकल्पना राबवून संघटना मजबूत करणे, नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणे हा संवाद यात्रेचा उद्देश असल्याचे आमदार खडसे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बोदवड तालुका निर्मिती मीच केली, त्यामुळे नागरिकांची शासकीय कामे बोदवडलाच होऊ लागली. वेळ आणि पैसा वाचला. १९९० पर्यंत बोदवड तालुक्यात एकही डांबरी रस्ता नव्हता. तालुक्यातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून बोदवडचा विकास साधला आहे. यावेळी आ. अनिल पाटील यांनी आ. चंद्रकांत पाटील यांचेबद्दल केलेल्या, “पलटी मारणारा माणूस “या विधानाचा खरपूस समाचार घेतला. जो पक्षश्रेष्टींना झाला नाही, तो तुम्हाला काय होणार? असा प्रश्न उपस्थितांना केला.
त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य तथा युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी सौ रोहिणीताईंच्या संकल्पनेतून सुरू असलेली जनसंवाद यात्रा ही पक्ष मजबूतीसाठी महत्त्वाची असून ती राज्यभर राबविली गेल्यास पवार साहेबांचे स्वप्न नक्कीच साकार होईल असा विश्वास व्यक्त केला
यावेळी मनोगत व्यक्त करताना रोहिणीताई खडसे यांनी १५ ऑगस्ट निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या श्रावण सोमवार संकष्ट चतुर्दशी या पावन दिवशी महादेवाचे दर्शन घेऊन नारळ वाढवून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ करीत आहे. पाऊस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा फार जवळचा संबंध असून,”ज्या ज्या दिवशी पाऊस आला त्या त्या दिवशी इतिहास घडला “असे त्यांनी नमूद केले. मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची गर्दी ही मतदारसंघात परिवर्तनाची लाट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच यात्रेची फलश्रुती दिसेल असा विश्वास रोहिणी ताई यांनी व्यक्त केला. १५ ऑगस्ट ला सुरू झालेल्या संवाद यात्रेचा समारोप दिनांक २६ नोव्हेंबर रोजी होणार असून या कालावधीत ४७ दिवसात १८२ गावात संवाद साधून समस्या जाणून घेणार असल्याची असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यात्रेदरम्यान शेवगा येथील अशोक टेकाळे, दिनकर रदाळ, गजानन ताठे, राजाराम सुलतानी, शंकर आहेर,निवृत्ती सोनवणे, रघुनाथ डिके, धोंडखेडा येथील सरपंच गीताताई मोरे,सुरत सिंग पाटील, ज्ञानेश्वर पाटील,गुलाब पाटील,मंगल पाटील,शिवराम दांडगे,गजानन जाधव, त्र्यंबक पाटील,रतन पाटील, डॉक्टर काजळे,वामन ताठे, कुऱ्हा हरदो येथील केसरीलाल फरपट, अशोक माळी, विलास जंजाळ, सोपान सोनवणे,विलास माळी,रुपेश माळी,शुभम जंजाळ, गजानन जांभे,दिलीप माळी योगेश पाटील पुंडलिक माळी, देविदास शेळके, विलास पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते