Friday, July 11, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसातही जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read

सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची गर्दी : नागरिकांनी मांडल्या विविध समस्या


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणीताई खडसे – खेवलकर ह्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली.दि १६ ऑगस्ट रोजी ह्या जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस होता. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावांमध्ये ही यात्रा पोहचणार आहे. स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. मुसळधार पावसातही कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही.

ह्या जनसंवाद यात्रेचे जो तो ज्याच्या त्याच्या परीने विश्लेषण करेल परंतु कुठल्याही प्रकारच्या निवडणुका समोर किंवा जवळ नसतांना लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या निराकरणासाठी निघालेली ही एकमेव यात्रा असावी. त्यामुळे स्वार्थासाठी ही यात्रा आहे अशी कोल्हेकुई करण्याचा जे प्रयत्न करतील बोलती बंदच झाली आहे. ज्यांचा पिंडचं जनसेवेचा आहे त्यांना लोकांशी संवाद साधण्यासाठी निवडणुकीची गरज नसते. जनसेवा हा त्यांचा ठायी स्वभाव असतो. हे रोहिणीताईंच्या ह्या जनसंवाद यात्रेतून अधोरेखित झाले आहे.

१६ ऑगस्ट रोजी जुनोना ,सोनाटी , अमदगावं ,हिंगणे असा सुरू झालेला प्रवास त्यात स्थानिक नागरिकांचा उत्साह बघता रोहिणीताईंची जनसंवाद यात्रा हे आपल्या हक्काचे व्यासपीठ असल्याचे जाणवले. लोकांनी घरकुल, मनरेगा विहिरींचे न मिळलेल अनुदान , विधवा महिला ,वृद्धांचे पगार , व्यायामशाळा , क्रीडांगण , सभागृह अशा समस्या मांडल्या नुसत्या मांडल्याच नाही तर त्याबाबत आग्रही मागणी केली. नाथाभाऊंनी आमच्या गावासाठी रस्ते दिले , सभागृह दिले , ज्या सुविधा दिसतायत त्या भाऊंनी दिल्या आहेत असे नागरिक ठिकठिकाणी प्रतिक्रिया देतांना सांगत होते. आमचा तालुका दुर्लक्षित होता पण १९९० साली नाथाभाऊ आमदार झाले तेव्हापासून डांबरी रस्त्यांचे इथे जाळे विणले गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रोहिणीताईंनी सुद्धा लोकांच्या ह्या समस्या ,अडचणी जाणून घेतल्या. “एका पराभवाने मी खचून जाणार नाही. निवडणुका येतील आणि जातील परंतु मी घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही.”असे सांगत भाऊंच्या माध्यमातून आता आपल्या समस्या सोडविल्या जातील त्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि मी स्वतः सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तुमच्या चेहऱ्यावर आज दिसत असलेले समाधान हीच आमची पुण्याई आहे ,जेव्हा केव्हा हाक द्याल तेव्हा मी आपल्या सेवेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजर राहीन असे आश्वस्त केले.

प्रत्येक गावात सेल्फी काढण्यासाठी असलेला तरुणाईचा आग्रह त्यांनी स्वीकारत प्रत्येक कार्यकर्त्यासोबत सेल्फी काढली. ह्यावरून तरुणाईत असलेली त्यांची क्रेझ पुन्हा दिसून आली. यात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदिप भैय्या पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान,माजी सभापती किशोर गायकवाड,विलास धायडे,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील,निलेश पाटील,शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, ज्ञानेश्वर पाटील,डॉ ए एन काजळे, विजय चौधरी, निना पाटील,जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे, कालू मेंबर,रवी खेवलकर,श्याम पाटील, फिला राजपूत, आनंदा पाटील, नईम बागवान,कृष्णा पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर,बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे,चेतन राजपूत, भैय्या पाटील, विकास पाटील, कविता गायकवाड, अश्विनी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जुनोने येथे बहादुरपाटील, कैलास पाटील, पंडित पाटील, गणपत पाटील, हिरामण ठेलारी, देविदास पाटील, विठोबा पाटील, पुंडलिक पाटील, सुभाष पाटील, अर्जुन पाटील, प्रल्हाद पाटील, मधुकर पाटील, वसंत गुरचळ, सुरेश गुरचळ, सुरेश सुरवाडे, प्रकाश सुरवाडे, साहेबराव पाटील, अजबराव पाटील, सिताराम पाटील, सुभाष बोदडे,सुनील बोदडे,प्रवीण बोदडे, शुभम गुरचळ, मुरलीधर शेजोळे, मुकुंदा गुरचळ,संजू परीहार,हरिभाऊ उमराव, दिलीप डोंगर, राजेंद्र पाटील,गजानन कौतिक, मंगल पाटील,शेषराव पाटील,विजय निनु,कृष्णा पाटील, सुनील हरसिंग, अरुण पाटील, भगवान जालम, अवचित पाटील,मुकुंदा पाटील, निंबाजी पाटील, सोनोटी येथे सरपंच सीमा तोरे, दीपक तोरे, सुनील बोदडे, बंडू पाटील, पप्पू पाटील, तानाजी तोरे, समाधान तोरे,अजय तोरे, पंडित तोरे, स्वप्नील बोदडे, तुषार बोदडे, श्रीकृष्ण बोदडे, विनोद बोदडे, भगवान बोदडे, पोलीस पाटीलअनिल इंगळे, भगवान इंगळे, नंदलाल पट्टे, शिवाजी पाटील, उखर्डू पाटील,रामेश्वर पाटील.

आमदगाव येथे सरपंच संभाजी पारधी, उपसरपंच मिलिंद गुरचळ,चंद्रकांत पाटील, गजानन कोलते,अमोल कोलते, निर्मलाबाई खोंडे, विशाल पाचपांडे, मनोज बोदडे,हेमराज पाटील,ज्ञानदेव आत्तरदे,वासुदेव किनगे, अमर पारधी, दत्तात्रय पाटील, प्रदीप किनगे,कडू पाटील, श्रीकृष्ण कोलते,भागवत पाटील, विनोद पाटील,

हिंगणे येथे रामराव पाटील, सरपंच मनीषा पाटील,उपसरपंच जनार्दन होडगरे, रवींद्र पाटील,राजेंद्र पाटील, आनंदा पाटील, पंडित पाटील, पांडुरंग न्याहाजी पाटील, पंडित होडगरे,सोपान होडगरे, जनार्दन होडगरे,निवृत्ती पाटील, रमेश पाटील, कृष्णा पाटील, संजय पाटील, नामदेव पाटील, भरत पाटील,सोपान होडगरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

Indian Post विभागात 1 लाखापेक्षा जास्त पदांसाठी मेगाभरती…

Next Post

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; UGC ने जाहीर केली शिष्यवृत्ती…अर्ज प्रक्रिया सुरू…

Next Post

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; UGC ने जाहीर केली शिष्यवृत्ती…अर्ज प्रक्रिया सुरू…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications