Friday, July 25, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनसंवाद यात्रेत रोहिणी खडसे यांनी साधला अपंग, विधवा,निराधार यांच्या समवेत संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read


तिसऱ्या दिवशी कोल्हाडी चिचखेडा शिरसाळा येथे यात्रेला प्रचंड प्रतिसाद;जनसंवाद यात्रेदरम्यान रोहिणीताईंच्या सतर्कतेने वाचले मध्यप्रदेशातील जखमी व्यक्तींचे प्राण

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने रोहिणी खडसे या मुक्ताईनगर वरून बोदवड तालुक्यात जात असताना त्यांना कालिंका माता मंदिर गेट माळेगाव फाटा येथे मध्यप्रदेशातील प्रवासी असलेल्या एका चारचाकी गाडीचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले चारचाकी वाहनहे रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे पंधरा फुट नालीत पलटी होऊन कोसळले होते पाच प्रवासी हे गंभीर जखमी होऊन वाहनात अडकून पडलेले होते ही बाब रोहिणी खडसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील जनसंवाद यात्रेसाठी रवाना झाल्या.

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी बोदवड तालुक्यातील चिचखेडा सिम, कोल्हाडी, शिरसाळा येथे भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. शिरसाळा येथील जागृत हनुमानजींचे दर्शन घेऊन त्यांनी तिसऱ्या दिवसाच्या जनसंवाद यात्रेला चिचखेडा सिम येथून सुरुवात केली. त्यानंतर कोल्हाडी ,व शिरसाळा येथे ग्रामस्थ, युवक,महिला,विद्यार्थी यांच्या समवेत संवाद साधून त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जनतेशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, गेल्या निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मला तब्बल ९० हजार मते देऊन माझ्या प्रती विश्वास दाखवला. थोडया मतांनी माझा पराभव जरी झाला तरी ९० हजार लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्या लोकांना आणि इतर सर्व लोकांना मी भेटायला आली आहे. माझा पराभव का झाला? कसा झाला? हे सर्व जण जाणतात. आता या संवाद यात्रेच्या निमित्ताने काही लोक मला भेटताहेत आणि “ती आमची चूक झाली… आम्ही ओळखण्यात कमी पडलो.” अशी स्पष्ट कबूली देत आहेत. येत्या काळात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी बळकट करायचा आहे.

गावातील संवाद यात्रेच्या निमित्ताने ठिकठिकाणी गावागावात काही पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन रोहिणी खडसे यांनी गावाकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जनमानसात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र फटाक्यांची आतिशबाजी व फुलांची उधळण करत स्वयंस्फूर्तीने रोहिणीताईंचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदिप भैय्या पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान,माजी सभापती किशोर गायकवाड,विलास धायडे,भागवत टिकारे, अनिल पाटील,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील,निलेश पाटील,शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ ए एन काजळे,प्रल्हाद किनगे ,विजय चौधरी, निना पाटील,जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे, कालू मेंबर,रामराव पाटील, चंद्रकांत देशमुख, हेमराज पाटील,रवी खेवलकर,श्याम पाटील, फिला राजपूत, भगत सिंग पाटील, मुकेश क-हाळे,आनंदा पाटील, नईम बागवान,निलेश माळी,कृष्णा पाटील, अजयसिंग पाटील,संदिप देशमुख,प्रदिप साळुंखे,अतुल पाटील, बाळाभाऊ भालशंकर,बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे,चेतन राजपूत, भैय्या पाटील, विकास पाटील,वंदना चौधरी, अश्विनी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदिप पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आता कोणत्याही निवडणूक नाहीत पण तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी रोहिणी ताई खडसे या गावात आल्या आहेत. त्यातील समस्या सोडविण्यासाठी आम्ही आ एकनाथ राव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पक्षाच्या कार्यकर्त्यानी सभासद नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले.

संवाद यात्रेचे प्रमुख ईश्वर रहाणे यांनी यात्रेचे स्वरूप आपल्या मनोगतातून व्यक्त केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, रामदास पाटील,यु डी पाटील सर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यात्रेत बोदवड येथील शिवसेना कार्यकर्ता गजानन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यात्रेत कोल्हाडी येथे श्रीकृष्ण राणे,नामदेव लढे , सरपंच वनिता ताई सुरळकर,प्रमोद ढाके,संजय नेवल, प्रफुल लढे, जिवन राणे, ईश्वर नेवल, मनोज खडसे,ज्ञानेश्वर सुरळकर, किशोर निकम, भिमराव सूर्यवंशी, योगेश झांबरे, नयन राणे, अक्षय सोनवणे, संदिप सोनवणे, आकाश राणे, अमित ढाके,अमोल ढाके,अतुल वराडे, नितीन बोरले, अतुल वराडे, एकनाथ ढाके,गिरीश लढे, नंदकिशोर राणे, चिचखेडा सिम येथे बाजार समिती उपसभापती सुभाष पाटील, सरपंच किशोर वानखेडे, पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, दिलीप डोके, गोपाळ पाटील, प्रकाश पाटील, समाधान पाटील, सुभाष येसकर,प्रल्हाद पाटील, गजानन डोके, नाना पाचपोळ,मनिषा पाटील, प्रकाश शिंदे शिरसाळा येथे विश्वनाथ पाटील, सरपंच प्रविण पाटील,शांताराम बोरसे,गजेंद्रसिंग पाटील, मुकेश गोसावी,काशीराम गोंधळी, शांताराम सरोदे, गणेश सूर्यवंशी, रवींद्र सुर्यवंशी, संजय बोरसे, समाधान पारधी, प्रभाकर गोसावी, नामदेव शेकोकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट !

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications