<
जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी टाकलेल्या छापेमारीत तब्बल १३ जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. याच दरम्यान लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र छापेमारी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण तर आपल्या मर्जीने इथे आलो, असा दावा केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर धाड टाकली होती. यावेळी लॉजवर १३ युगुलं पोलिसांना सापडली.
ताब्यातील मुलींमध्ये कॉलेजवयीन तरुणी
धाडसत्रात एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले, तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं आढळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत.
स्वतःच्या मर्जीने आलो, मुलींचा दावा
एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बातमी कळतच नाही .. इतक्या जाहिरात त्यात