Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)-

तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे,अन्यथा ३ ऑगस्ट पासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोरसेना भारताने दिला आहे .या संदर्भात गोर सेना भारताचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अर्जुन मातु चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,जळगाव यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले .
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रामेश्वर तांडा येथील गट क्रमांक ६७/३ मधील शासकीय गावरान जमीन ‘संत सेवालाल महाराज’ बंजारा / लमाण तांडा समृद्ध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजूर करण्याची शासनाची तरतूद असूनही गेल्या अनेक वर्षापासून या तांड्यातील भूमिहीन वंचित कुटुंबांना त्यांचा लाभ मिळालेला नाही परिणाम अनेक कुटुंब घरकुला सह मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच रामेश्वर ग्रामपंचायतीतील कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने नागरिकांची विविध प्रशासकीय कामे रखडली असून ग्रामपंचायतीचा कारभारावर त्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे जबाबदार व नियमित उपस्थिती राहणाऱ्या कामस्वरूपीय ग्रामसेवकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ग्रामपंचायतील काही प्रशासकीय निर्णय, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच कथित बनावट अर्ज करण्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोरसेनेने केली आहे.
निवेदनात 2023 ते 2026 या कालावधीत तहसील कार्यालय,ग्रामपंचायत ठराव, शासन निर्णय आणि विविध पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 3 अगस्त 2026 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय सोमवार बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनादरम्यान रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल असा इशाराही गोरसेनेने दिला आहे. गोल सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन मातू चव्हाण यांनी प्रशासनाने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन भूमीहीन नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

Next Post

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

Next Post
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती... मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo