<
चाळीसगाव/रांजणगाव 21 ऑगस्ट – (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्त चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे यशवंत सर्वांगिण विकास संस्था आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ” महिला आरोग्य मेळावा २०२२” घेण्यात आला.
या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून कोरो इंडिया या संस्थेचे उत्तर महाराष्ट्राचे विभाग प्रमुख सुनील अहिरे व त्याचे सहकारी सचिन फटकळ यांची उपस्तिती लाभली तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर निलांबरी तेंडुलकर (स्री रोग तज्ञ) आणि डॉक्टर पायल पवार (मानसोपचार तज्ञ) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली ,तदनंतर प्रमुख अतिथी तसेच मार्गदर्शक याचे स्वागत सत्कार करण्यात आला ,त्यानंतर मार्गदर्शक डॉक्टर निलांबरी मॅडमानी कार्यक्रमाला उपस्थीत किशोरवयीन मुली तसेल महिलांना महिलांचे आरोग्य व मासिक पाळी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, मार्गदर्शन करताना मासिक पाळी विषयाचे शास्त्रीय करणे व त्याविषयी असलेले समाज – गैरसमज आणि अंधश्रद्धा या विषयी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर उपस्थित मुली व महिलांच्या प्रश्नाचे निरसन करण्यात आले.
तरी सदर मार्गदर्शनानंतर डॉक्टर पायल पवार मॅडमानी मुलीचे तसेच महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शन करताना मॅडमानी मन म्हणजे काय? ते कसे आजारी पडू शकते याविषयी माहिती दिली , तसेच दैनंदिन जीवन जगताना ताण तणावाचा आणि कामकाजाचा प्रभाव आपल्या मानसिक स्थितीशी कशाप्रकारे जुळलेला आहे. हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि हसत खेळत समजावून सांगितले
तसेच दैनंदिन जीवनात योग्य आहार मनोरंजन यांचा उपयोग करून आपले मानसिक आरोग्य कसे निरोगी ठेवावे हे त्यांनी समजावून सांगितले.डॉक्टर पायल पवार ह्या सी.टी. केअर हॉस्पिटल येथे सेवा देत असतात.
सदर कार्यक्रमात गावातील किशोरवयीन मुली आणि महिलांनी उत्स्फ़ुर्तपणे सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पतेश देशमुख यांनी केले ,तसेच प्रास्ताविक विजया ठाकूर यांनी केले. कार्यक्रमासाठी सुनीता सूर्यवंशी, पवन राठोड उमा चव्हाण ,वनिता राठोड ,चेतन सूर्यवंशी(गुरु) इ. यांनी मेहनत घेतली.