सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) लवकरच 10 DRTC (संरक्षण संशोधन तांत्रिक संवर्ग) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध करणार आहे. या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन ही अधिसूचना तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

या पदांची भरती केली जाणार आहे
DRDO द्वारे जारी करण्यात आलेल्या या भरती अंतर्गत, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-B (STA-B) आणि तंत्रज्ञ-A (Tech-A) या पदांवर भरती केली जाईल. या पदांवरील उमेदवारांच्या भरतीसाठी, DRDO द्वारे परीक्षा घेतली जाईल.

10वी पास अर्ज करू शकतात
DRDO द्वारे प्रसिद्ध होणार्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-B (STA-B) आणि तंत्रज्ञ-A (Tech-A) भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतील. भरतीचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. अर्जदारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावी.











