<
लोहार समाजाची आगळीवेगळी माहिती व वैचारिक विवेचन असलेल्या व पेशाने इंजिनिअर असलेले श्री विजयराव रूम, जळगांव यांनी स्वतः लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा रविवार दिनांक 21/8/2022 रोजी आळंदी (पुणे) ,येथे लोहार समाजाचे भूषण व ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्नीध्यात असलेल्या विश्वकर्मा धर्मशाळेच्या भव्य सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पडला. महाराष्ट्रातून हजारपेक्षा जास्त संख्येने आलेल्या लोहार समाज बांधवांच्या उपस्थित व
मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातुन विविध लोहार संस्थांचे पदाधिकारी ,मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
सुरूवातीला भगवान श्री विश्वकर्मा प्रभूंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तीन वेळा दीर्घ
ओमकाराचे उच्चारण करण्यात आल्यानंतर जगात
ज्ञात अज्ञात मृत्यू पावलेल्या बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नंतर प्रास्ताविकामध्ये धर्मशाळा अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केल्यावर रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी श्री दिनेश सोनाळेकर सर यांनी प्रकाशनाचे निवेदन केले.त्या नंतर या पुस्तकाचे रितसर प्रकाशन, कार्यक्रमाचे अध्यक्ष व सातारा महासंघ अध्यक्ष श्री सदाशिवराव हिवलेकर साहेब, महासचिव प्रा.डॉ.साहेबराव पोपळघट, कार्याध्यक्ष श्री किसनराव बलांसे, धर्मशाळेचे अध्यक्ष श्री दिलीप थोरात ,विश्वस्त बाळासाहेब थोरात,पुणे मेट्रोचे डेप्युटी मॅनेजर श्री शिवाजीराव चाफेकारंडे,श्री विद्याधर पिंपळे (संचालक, ऑप्टिकल हट, पुणे),,श्री राजेंद्र थोरात,(संचालक,चिंतामणी इंन्फ्रा ऍन्ड पी इ बी सोल्यूशन प्रा.लि.,पुणे),,श्री दिनेश सोनाळेकर सर, शिक्षणाधिकारी, (रायगड)श्री अण्णासाहेब जोशी, ठाणे (मुंबई ),श्री सुरेश मांडवगडे (गडचिरोली) यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात पुस्तकात समाजाबद्दल दिलेल्या माहितीवर वेगवेगळ्या अंगाने प्रकाश टाकला. ह्या माहितीचा समाज बांधवांनी अभ्यास करून समाज विकास साठी हातभार लावावा असे आवाहन मान्यवरांनी केले.पुस्तकातील विवेचन,माहिती व व्यंगचित्रांचे सर्वांनीच विशेष कौतुक केले.
यावेळी लेखक विजयराव रूम यांनी आपले सविस्तरपणे पुस्तकाची भूमिका मांडली व उपस्थित सर्वांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत चर्चा केली.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण लोहार समाज बांधवांची उपस्थिती लाभली.त्यात विशेष करून कॅप्टन विजय सुर्यवंशी, कॅप्टन रघुनाथ देसाई, श्री शिवाजी कळसे, श्री बाळासाहेब शेलार, श्री बाळासाहेब थोरात,श्री अशोक दातार, किशोर रूम,प्रा.संजय कांबळे सर(सर्व पुणे), राजाभाऊ पराळे,शरद सावळे(नागपूर), श्री राजेंद्र कळसाईत, श्रीकृष्ण प्रधान (वर्धा),श्री दिनकरराव गाडेकर, श्री प्रदिप वाघ (औरंगाबाद), श्री सुधाकर दापकेकर (उदगीर), श्री मधुकर ढोले, श्री सुरेश दिशागज(बुलडाणा),
प्रा.आर् एस् चाफेसर(परभणी), डॉ एकनाथ लोहार, श्री सुरेश बोंडारे (जळगांव), श्री बळीराम खरे,प्रा.अण्णासाहेब जोशी (ठाणे, मुंबई),यांचेसह समस्त लोहार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे live प्रसारण आणि सुत्रसंचालन श्री दिनेश सोनाळेकर,साहेब,शिक्षण अधिकारी,पुणे यांनी अतिशय सुंदर,चोखपणे पार पाडले.तसेच हा कार्यक्रम पारपाडण्यासाठी धर्मशाळा अध्यक्ष व सर्व विश्वस्त,आळंदी,पुणे समाज प्रेमी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले, तर सुंदर असे वक्तृत्व असलेले प्रा. विश्वासराव रूम, लोहार सर यांनी महाराष्ट्रातून या कार्यक्रमास आलेल्या / उपस्थित उदघाटक, प्रमुख पाहुणे आणि लोहार समाज बांधवांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
विशेष म्हणजे या ठिकाणी एक बुक स्टॉल सुद्धा लावण्यात आला होता. यानंतर आनंदी वातावरणात सुरुची भोजनाचा आस्वाद सर्व बांधवानी घेतला.