<
कु. सुजाता मोतीलाल सोनवणे व प्रनव प्रतापराव सुर्वे गुणवत्ता यादीत
लोहारा ता. पाचोरा (प्रतिनीधी) – धी. शेंदुर्णी सेकं. एज्युकेशन को. ऑफ .सोसा.व्दारा संचालित लोहारा डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षी राष्ट्रीय परिक्षा परिषद नवी दिल्ली ,तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध (एन एम.एम.एस.) परिक्षेत विद्यालयाचे दोन विद्यार्थी कु.सुजाता मोतीलाल सोनवणे व प्रनव प्रतापराव सुर्वे.हे दोन गुणवत्ता यादीत आले असून या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.यशस्वी विद्यार्थी प्रनव प्रतापराव सुर्वे विकासो संचालक प्रतापराव सुर्वे यांचा मुलगा तर कु सुजाता मोतीलाल सोनवणे ही माळी समाजाचे कार्यकर्ते मोतीलाल सोनवणे यांची कन्या आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना उपक्रमशिल शिक्षक वाय.पि.वानखेडे ,पी.एम सुर्वे ,व्हि.एम शिरापुरे ,आर.जी.बैरागी ,डी.एम. गरुड,या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड, संस्थेचे सचिव सतिष काशिद, महिला संचालिका सै.उज्वला काशिद , सहसचिव दिपक गरुड, वस्तीगृह सचिव कैलास देशमुख सरपंच अक्षय कुमार जैस्वाल, उपसरपंच आबा चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी ,गा्मपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, अर्जुन पाटील, सुरेश मोरे, अशोक माळी,हिरालाल जाधव, विकासो चेअरमन शरद सोनार व संचालक मंडळ विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष भिमराव आबा शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ.अ.पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस.परदेशी उपमुख्याध्यापीका यु.डी.शेळके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण प्रेमी व पत्रकार आदिंनी अभिनंदन केले.