<
भडगाव (प्रतिनिधी)- येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव संचलीत,गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथील संघाने वैयक्तिक क्रीडा प्रकारातील तालुकास्तरीय १४ व १९ वर्षाआतील मुलींच्या मैदानी (अॕथेलेटीक्स) स्पर्धेत अनेक प्रकारात प्रथम तसेच द्वितीय येऊन महाविद्यालयास विजयश्री प्राप्त करुन दिली.
नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षाआतील गटात जानवी पाटील(100 मी.प्रथम),योगिनी पाटील(200 मी.प्रथम),शुभांगी पाटील (गोळाफेक,तृतीय) तर १९ वर्षाआतील गटात ललीता परदेशी,(४०० मी.द्वितीय,400 मी.हर्डल्स),भावना पाटील(800 मी.,4×100 रिले,तिहेरी उडीत प्रथम),मुस्कान शेख(1500 मी,100 मी.हर्डल्स,4×100 मी.रिले प्रथम),श्रध्दा महाजन(4×100 मी.रिले प्रथम),निकीता परदेशी(उंच उडीत प्रथम),नंदिनी केदार(हातोडा फेक व उंच उडीत द्वितीय),फरहाना कौसर(100 मी.हर्डल्स प्रथम,तिहेरी उडीत द्वितीय), जयश्री पाटील(4×100 मी.रिले व भालाफेकमध्ये प्रथम),रुपाली हिरे(3000 मी.,लांब उडी तसेच 4 कि.मी.क्राॕसकंट्रीत प्रथम), निकीता सरदार(3000 मी.व 4 कि.मी. क्रॉसकंट्रीत द्वितीय), नेहा सरदार (1500 मी.द्वितीय),दिव्या देसले(800 मी.द्वितीय), सत्यभामा पवार (3 कि.मी.चालणे प्रथम),जागृती पाटील(3 कि.मी.चालणे द्वितीय), सपना केदार (थाळीफेकमध्ये द्वितीय तर गोळाफेकमध्ये तृतीय), स्वाती पाटील (हातोडाफेकमध्ये प्रथम तर भालाफेकमध्ये द्वितीय) ह्याप्रमाणे विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंनी यश मिळवले असून त्यांची जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंच्या संघाच्या व्यवस्थापिका म्हणून प्रा.सौ.सोनाली सोनवणे तर क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,आर.एस.कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी प्रशिक्षक म्हणून लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,मंत्रालयीन कक्ष अधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा दुध संघाच्या संचालिका पुनमताई पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले,महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, एस.पी. माळी, पर्यवेक्षक टी.एस.पाटील,प्रा.आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार, अरविंद देसले,चेतन भोसले,राहुल सोनवणे आदींनी कौतुक करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.