Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उडाण फाऊंडेशनतर्फे फिजिओथेरपी दिनानिमित्त १५० नागरिकांची मोफत तपासणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2022
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.७ – जळगाव जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करण्यात आला. उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या माध्यमातून दिवसभरात १५० दिव्यांग बालक आणि त्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात दिव्यांग मुलांसाठी उडाण फाऊंडेशन नेहमी विविध उपक्रम राबवित असते. गेल्या महिन्यातच दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. बुधवार दि.७ सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त उडाणच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरीपी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थी तसेच इतर पालकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर घेण्यात आले. दिवसभरात १५० विद्यार्थी, नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याणचे अधिकारी हे लाभले तर भरत चौधरी, पुष्पा भंडारी, धनराज कासाट, विनोद बियाणी, एस.पी.गणेशकर यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांनी करताना शिबिराचे महत्व तसेच उडाणचा उद्देश स्पष्ट केला. शिबिरात फिजिओथेरीपीस्ट डॉ,निखिल पाटील, डॉ.प्रीती पाटील, डॉ.आदित्य खाचणे, डॉ.केतकी साखळकर, डॉ.रिद्धी भंडारी, डॉ.अश्विनी मोलेकर आणि सोबत इतर ७ डॉक्टर्स यांनी सर्व पेशंटची तपासणी आणि उपचार केले. सूत्रसंचालन उज्वला वर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी उडानच्या अध्यक्ष हर्षाली चौधरी यांच्यासह चेतन वाणी, जयश्री पटेल, सोनाली भोई, हेतल वाणी, अनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

Next Post

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

Next Post

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo