<
के.व्ही.पेंढारकर महाविद्यालय,डोंबिवली येथील विद्यार्थ्यांच्या समस्या,अडचणी,प्रश्न ताबडतोब सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महाविद्यालय युनिट तयार
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने बहाल केलेले आपले हक्क व अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर महाराष्ट्र स्टुडन्ट्स युनियनमध्ये (मासु) सामील व्हावे – ॲड . सिद्धार्थ सोनाजी इंगळे
मुबंई – (प्रतिनिधी) – दि.०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु)या विद्यार्थी संघटनेने पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली येथे आपल्या युनियनच्या महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी (GS) पदावर श्री.चंद्रमणी तसेच कॉलेज प्रतिनिधी(CR) पदावर श्री.अनिकेत हिवाळे यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सातत्याने राज्यसरकारकडे विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका आयोजित करण्याची मागणी करत आहे, युनियनच्या मते गेल्या तीस वर्षांपासून या निवडणुका जाणीवपूर्वक बंद करून सर्वसामान्य गोरगरीब, कामगार, कष्टकरी आदिवासी, मागासवर्गीय तरुणांना सामाजिक व राजकीय व्यवस्थेतून हद्दपार करण्याचे षडयंत सुरु आहे त्यामुळे विद्यापीठ व विद्यार्थी विकास खुंटलेला आहे असे मत मासुचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी म्हटले आहे.
आज मासुने महाविद्यालयीन जनरल सेक्रेटरी पदावर चंद्रमणी तसेच कॉलेज प्रतिनिधी या पदावर अनिकेत हिवाळे यांची नियुक्ती करून परिवर्तनाला सुरुवात केलेली आहे या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उदंड लाभला.
महाराष्ट्रभर विद्यापीठ अध्यक्ष व महाविद्यालयीन नियुक्त्यांचे मासुचे नियोजन आहे असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे महासचिव ॲड. प्रशांत आशा वसंत जाधव यांनी यावेळी सांगितले, पेंढारकर महाविद्यालयचे मुख्याध्यापक सर यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनला शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचा उज्वल भविष्यासाठी आम्ही नेहमी सोबत आहोत अशी ग्वाही दिली त्याचबरोबर पेंढारकर कॉलेजचा कॉलेज स्टाफ ने सुद्धा युनियनला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे या सोहळ्यासाठी युवकांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी आले असता त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व आपल्या हक्क अधिकार यासाठी लढण्याची इच्छा निर्माण केल्याचे पाहायला मिळाले तसेच मासूचे कार्याध्यक्ष ॲड.सुनील प्रताप देवरे व महासचिव ॲड. प्रशांत आशा वसंत जाधव, कल्याण-डोंबिवली तालुका अध्यक्ष रोहित मस्के सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते,नवनियुक्त न्यू हायस्कूल स्कूलची मासूची टीमसुद्धा उपस्थित होती तसेच मासूचे इतर पदाधिकारी नरपत कुमावत, नोमान खान, रुचित शेठे विनीत रावल सारंग राठोड तसेच चिराग , प्रतीक माने, आनंद सिद्धू संगम जाधव उपस्थित होते.