<
जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -15-महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 अन्वये जमीन महसुलाची वसुली करणे बाबत तरतुद आहे. त्यानुसार श्री. संजय घनश्याम शर्मा यांचेकडे करमणुक केबलची थकीत प्रलंबीत रक्कम रुपये 31.73,478/- प्रलंबीत असुन त्यानुसार प्रस्तुत थकबाकीची रक्कम पुर्णत: वसुल करण्यासाठी संबधित थकबाकीदार यांच्य नावे असलेल्या स्थावर मालमत्ता त्याची मेहरुण शिवारातील सामाईक मालकीचे नाव असलेली बिनशेती क्षेत्र गट नं. 463/1/2 मधील भुखंड 4 क्षेत्रा 289 पैकी 72.25 चौ.मी.वर रक्कम रुपये 31.73.478/- अक्षरी ऐकतीस लाख त्रयात्तर हजार चारशे अठठयात्तर मात्र बोजा दाखल करण्यात आलेला आहे.
करमणुक कराच्या थकबाकीचा बोजा बसवुन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील तरतुद नुसार लिलाव करुन थकबाकीची रक्कम लिलावाच्या रक्कमेतुन वसुल करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार फेरफार क्र / 94002/दि. 8 जुलै, 2021 रोजी नोंद करण्यात आलेली असुन 7/12 उताऱ्यावर सरकार नांव लावण्यात आलेले आहे. तरी या जागेचे दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालय जळगाव येथे लिलाव करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी लिलावात भाग घ्यावा लिलावातील अटी व शर्ती लिलावातील जागा लिलावातील बोलहातची किंमत इत्यादी बाबत तहसिलदार जळगाव यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.