<
विश्वकर्मिय समाजाने वेरुळमध्ये उचलली सामाजिक क्रांतीकडे पाऊले…
संभाजीनगर – (प्रमोद सोनवणे ) – १७ सप्टेंबर, निमित्त सृष्टी निर्माता प्रभू श्री विश्वकर्मा पूजन दिन विशेष सोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटने मार्फत महाराष्ट्रातील विश्वकर्मा पूजन दिवस तथा महामेळावा आयोजित केला गेला होता. नागोजीराव पांचाळ सर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हातून दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली गेली.. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात २८ लाख लोकसंख्या विश्वकर्मा समूहाची आहे. जर यापैकी १ लाख लोक जरी एकत्र जमा झाले व वैचारीक क्रांती करायची ठरवली तर एक नवीन संस्कृती, एक नवीन विचार व एक नव समाज घडविण्याच्या बाजूने पाऊल पडून ‘समाजक्रांती’ घडेल.. विश्वकर्मिय समाजाची इतिहासातील कामे पाहता हा समाज गणित, हिशोबी व तंत्रज्ञान जाणणारा समाज होता… छत्रपतीं शिवरायांनी विश्वकर्मिय कारागिरांकडून समुद्रातील पहिले आरमार बनवून घेतले.. हा इतिहास आहे.
विश्वकर्मावंशी समाजाचा महामेळावा वेरूळ येथे संपन्न झाला. विश्वकर्मावंशीय समाज संघटनेतर्फे वेरूळ येथे सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, ताम्रकार या शिल्पिसमूहातील विश्वकर्मीयांचा महामेळावा विश्वकर्मा मंदिर वेरूळ येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुखातिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून विश्वकर्मीय बांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमास लागली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक गणेश सोनवणे यांनी दत्ताजी भाले ब्लड बँक छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यामध्ये अनेक विश्वकर्मीय बांधवांनी रक्तदान केले.
तसेच आय एम सी टीम तर्फे आरोग्यविषयक
आयुर्वेद प्रोडक्ट व रोजगार विषयक ची माहिती
देण्यात आली यावेळी IMC कंपनीचे आबेसीटर
स्टार नारायणजी डोरले सर माजलगाव IMC
कंपनीचे गोल्ड स्टार निलेश चिक्षे माजलगाव परतुर टिम कडून आसाराम गायकवाड संतोष यादव सर व IMC चा सुपरस्टार विजय सुतार उमळवाड ता शिरोळ जि कोल्हापूर आदींनी रोजगार व आरोग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम दरवर्षी 17 सेप्टेंबर रोजी वेरूल येथे साजरा होतो. या कार्यक्रमास प्रमुख अतिथि वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाश आंबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री नागोराव पांचाळ प्रमुख उपस्थितीमध्ये श्री योगेश बन, श्री संदीप सिरसाठ, श्री बकले मामा, श्री बजरंग खर्जुले, श्री संजय शहाणे, श्री चक्रपाणि चोपपवर, श्री दिलीप दीक्षित, श्री विष्णु बप्पा, श्री सचिन सुतार, श्री संजय सुतार, श्री राजेन्द्र दांडगे, श्री दिलीप सोनवणे, श्री भाऊसाहेब राऊत, श्री विलास पवार, श्री बालाजी खरडे, श्री राजेश पंडित, गणेश गव्हाणे किसगंधा , , पांचाळ दिलीप सोनवणे श्री संजय सुतार, तर वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तसेच बुलढाणा जिल्ह्यातून डॉक्टर गजाननराव पातुरकर गजानन सुरशे अंकुश मुऱ्हेकर विजय गाडेकर, आदिनाथ सोनुणे माऊली मानतकर उपस्थित होते. पोलिस यंत्रनेचे योग्य नियोजन होते.
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 28 लाख विश्वकर्मी बांधव पैकी एक लाख विश्वकर्मा बांधव जर या ठिकाणी आले तर व्यवस्थेला तुम्हाला मागायची गरज पडणार नाही ते तुम्हाला सामील करून घेतील अशे सांगितले. सगळी धार्मिक पूजा, पुरातन विश्वकर्मा मंदिर, विश्वकर्मा कुंड (अहिल्याबाई होळकर कुंड) येथून भव्य दिंडी मिरवणूक निघत कन्नड रोड मंदिर येथे सांगता झाली. जवळ पास 7 हजार च्या वर विश्वकर्मीय बांधव यांची उपस्थित होती.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नागोराव पांचळ यांनी समाज आता राजकीय व्यवस्थेत उतरत आहे त्याची दखल घ्यावी अशे व्यक्त केले. राज्य नवीन कार्यकारणी तैयार करुण कार्यक्रम सांगता झाली.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी हिंगोली चे श्री बजरंज
खरजुले तर राज्य सचिव पदी श्री दिलीप सोनवणे तर राज्य उपाध्यक्ष पदी श्री बालाजी खरडे, श्री रवि चंनेकर, प्रवक्ता पदी श्री विलास पवार व श्री भाऊसाहेब राऊत पदी नियुत्ति नागोराव पांचाळ सर यांनी जाहिर केली.उत्तर महाराष्ट्र येथुन अरूण भालेकर , सुनिल जानवे , समाजसेवक गणेश सोनुने, भगवान वाघ , किशोर मिस्तरी, राजेन्द्र दाडगे, भास्कर जंजाळकर, वामन जंजाळकर, प्रविण सिरसाठ, रविन्द्र जंजाळकर, गोपाल शार्दुल, रमेश सुरळकर, हेमंत भालेराव, मुक्ता वाघ, मनिषा दांडगे, वैशाली शिरसाठ, सुंनदा शिरसाठ व ईतर बांधव उपस्तित होते.
या कार्यक्रम साठी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे उद्योजक रविंद्र पांचाळ, राज्य उपाध्यक्ष अरुण भालेकर, मराठवाडा अध्यक्ष गोपाल राऊत, जिल्हा अध्यक्ष शिवानंद थोरकर, गणेश सोनुने, गणेश गव्हाने, चंदू हिवाळे, रवि चंनेकर, कल्याण घुसळकर, परमेश्वर पांचाळ, बालाजी पांचाळ, संदीप भालेकर, किशोर भागवत, व्यंकटेश पांचाळ, प्रवीण भागवत, मंगेश सपकाळ, दादाराव सोनवणे, शरद वाघ, गोपाल महामुनी, आदिनी मेहनत घेतली.