<
पाचोरा-(प्रतिनिधी)- तालुक्यातील निपाणे येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री दलित समाजाच्या महिलेचे जातीचे कारण दाखवत अंत्यसंस्कार करू न दिल्या प्रकरणी दखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असं निवेदन पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा यांना आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी दिले आहे.
वंचित बहुजन आघाडी पाचोरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे निपाणे ता. पाचोरा जि. जळगाव येथील सौ. निलाबई धनुर्धर यांचे दि. ११/०९/२०२२ रोजी रात्री निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी दुसऱ्या दिवशी दि. १२/०९/२०२२ रोजी निपाणे येथे करण्याचे निश्चित झाले होते. निपाणे येथे जिल्हा परिषद जळगाव यांच्या निधीतून सार्वजनिक स्मशान भूमीचे बांधकाम केलेले आहे. दि. १२/०९/२०२२ रोजी पाऊस असल्या कारणाने मयताच्या नातेवाईकांनी सदर स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्याबाबत निर्णय घेतला होता मात्र जि. प. माजी सदस्य व शिवसेना गटप्रमुख तथा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उर्फ मनोहर गिरधर पाटील यांनी व सरपंच आणि गावातील १०/११ मराठा समाजाच्या लोकांनी ” हे स्मशानभूमी मराठा समाजासाठी आहे आम्ही बांधलेली आहे. महारांना येथे त्यांची प्रेत जाळता येणार नाही” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली व सरनावरचे लाकडं ही ढकलून फेकून दिले. तसेच प्रेताचे हेळसांड केली याबाबत वरील संदर्भ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
तरी सदर घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असून दोन समाजान मध्ये जातीय तेड निर्माण करणारी आहे. म्हणून कुठली कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे आक्रमक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले आहे.